रुतबा तुझ्या रुपाला

रुतबा तुझ्या रुपाला दिसतो खुलून आहे
गझला कुणी तुझ्यावर बसला लिहून आहे
सौन्दर्य आज खुलले खिळल्या अनेक नजरा
आदब सलाम तुजला करतो लवून आहे
रेखून चित्र झाले भरण्यास रन्ग आता
केशर गुलाब दोन्ही घेतो खलून आहे
बागेत भेट पहिली चाफ्यास याद आहे
दरसाल याच दिवशी फुलतो अजून आहे
मेघास काय ठावे मनभाव चातकाचे
मस्तीत आपुल्या तो करतो जुलूम आहे
माझी बिशाद कुठली देण्यास भेट तुजला
तुकड्यास काळजाच्या देतो छिलून आहे
विषयात रन्गण्याचे सन्पून विषय गेले
सुकल्या फुलास आता पडणे गळून आहे
निशिकान्त तव इरादे आकाश पेलण्याचे
सोडून दे जर कुणी तुजवर जळून आहे
निशिकान्त देशपान्डे
प्रतिक्रियेचे स्वागत फोन नम्बर 98907 99023
http://nsd-marathigazals.blogspot.com/
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
सुकल्या फुलास आता पडणे गळून आहे
शुद्ध गझल!