ऋतू येत होते ऋतू जात होते...

ar_diamonds's picture

(मी गझल कार्यशाळेला नव्हतो. तरी एक प्रयत्न....अभ्यास म्हणून....)

ऋतू येत होते ऋतू जात होते
तुझे गीत माझ्या श्वासात होते

न्याहाळीत होते जरी मीच मजला
प्रतिबिंब तुझे परि आरशात होते

धुंद चांदव्यात फुलला देह सारा
मुक्त भावनांची बरसात होते

रंगले कितीही ऋतू रंगात मी रे
शामली तुझी शाम रंगात न्हाते

ओठांवरी ओस थरथरारे
स्मरणी सख्या रे मनी चिंब होते

दाटूनी येता सयींचा उमाळा
उरी प्राणशक्ती कंठात येते.