का...?

झाली तपश्चर्या वेदनांची,का मनी आकांत नाही
राख झाल्या चिता सयींच्या,का स्मशान शांत नाही
तप्त चांदवा मनात,का चांदण्यांची वरात नाही
साथ सुरेख मॅफिलीला,का आर्तता स्वरांत नाही
धुके पसरले जीवनी,का ओल त्या दवात नाही
धूंद बहरले गुलाब, का गंध त्या फूलांत नाही
भेट घडता नयनांची, का ओढ त्या नजरांत नाही
क्रुष्णधवल स्वप्नं सारी, का रंग त्या स्वप्नांत नाही
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा