सांग मित्रा...

गाव होते शांत आता काय झाले, सांग मित्रा
दंगलीची क्रूर भाषा कोण व्याले, सांग मित्रा
सावली होण्या जगाची सोसला ज्यांनी उन्हाळा
सोबती त्यांच्या चितेवर कोण आले, सांग मित्रा
माणसाने आणली ही अंगणी आकाशगंगा
हरविले कोठे सुखाचे धुंद प्याले, सांग मित्रा
लाख डोळ्यांच्या सवालांनी जरी मज ठार केले
नाव कोठेही तिचे नाही निघाले, सांग मित्रा
मी कसा होतो, जगाला हे उगा सांगू नको तू
माझिया गझलेत होते शब्द ओले, सांग मित्रा
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
काय हे???
एकही प्रतिसाद नाही???
अप्रतिम 'मुद्दे' असलेली गझल! शेवटच्या शेरात 'अलामतीची' 'बलामत' केली हे सोडून!
'नाव कोठेही तिचे नाही निघाले .... सांग मित्रा' - व्व्व्व्व्व्वा!
अभिनंदन! (नाव कोठेही तिचे नाही निघाले - अप्रतिम!)