खरे तेच ...

संजय इंगळे तिगावकर's picture

जरा थांब तू ऐक माझा खुलासा
अता पापण्यांना पुरे हा दिलासा

गुन्हा हाच होता तुला भेटलो मी
गुन्हेगार हा श्वास माझा जरासा

तुला गुणगुणाया जिथे गीत नाही
असा सूर वाटे मलाही नकोसा

पुन्हा राख झालोच तेजाळताना
तरी सांग का सोडला मी भरोसा

जरी ओठ ओठास टाळून गेले
खरे तेच सांगून गेला उसासा