बात नाही !

उपरा's picture

बिंब माझ्या अनुभवांचे ज्यात नाही
ते फुलांचे गीत खोटे गात नाही

आज गाभार्‍यात कां काळोख दाटे ?
वाचली कां एकही फुलवात नाही ?

जन्म अख्खा कोरला त्याने कपाळी
भोगल्या वाचून कोणी जात नाही

जीवना ठाकेन मी पुन्हा लढाया
हा विसावा तू दिलेली मात नाही

कातडी झाली जगा कां राठ माझी ?
की तुझ्या घावात आता बात नाही ?

बेफिकीर's picture

हा विसावा तू दिलेली मात नाही

गुणी गझल! 'पुन्हा' या शब्दात मात्रा कमी पडत आहे असे माझे मत!