जगा !

उपरा's picture

जगा मी तुला कां पटू लागलेला ?
तुझ्यासारखा की दिसू लागलेला ?

तुला पाहताना झुला व्हायचो मी
जुना झोल आता सरू लागलेला

तुझा डंख माझ्या इमानास झाला
उभ्या रोमरोमी भिनू लागलेला

असे मिसळूनी एकमेकात गेलो
तुझा श्वास माझा असू लागलेला

कधी संपलो सोसताना कळेना
कुणी आत आता कण्हू लागलेला

उभा जन्म शिक्षेपरी वाहिला मी
सुटायास कां घाबरू लागलेला ?

बेफिकीर's picture

फारच वर्णनात्मक

रचना फारशी आवडली नाही. क्षमस्व!