काजवे

काजवे धुंदीत कोण्या मग्न होते
सूर्य माझा जाळण्याचे स्वप्न होते
माणसे साधीच होती भोवताली
माणसांना जाळणारे यज्ञ होते
गाव होते साव आणिक सज्जनाचे
आपल्या घरटयात सारे नग्न होते
लोक भगवे, श्वेत, हिरवे अनं निळेही
पांघरोनी वेड सारे सूज्ञ होते
कापला माझा गळा पण रक्त नाही
ते असे माहीर होते, तज्ज्ञ होते
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
अकारान्त स्वरकाफिये
मराठीत अयोग्य ठरतात. रचनेचा बाज / पोत कंटाळवाणा व वर्षानुवर्षे वापरलेला वाटला. मात्र काही ओळी आवडल्याच!
शुभेच्छा!