नव्या ऋतूंची वाट पाहुनी रंग फुलांचे विटले होते

कैलास गांधी's picture

ज्याच्या नाराजीने सध्या नवीन वादळ उठले होते
हे शोधा कि आधी त्याचे किती जणांशी पटले होते

बाग जरा नाखुशच होती फुलांनीच समजोता केला
नव्या ऋतूंची वाट पाहुनी रंग फुलांचे विटले होते

पाय मोकळे झाल्यावरती उभा राहिला नवाच गुंता
सुटे, मोकळे होण्यामध्ये हात जरा गुरफटले होते

पुसू नका आरसे उगाचच तोंडावर मारत जा पाणी
रोज नव्या रंगानी मुळच्या चेहऱ्यांना बरबटले होते

जीवानिशी जे गेले त्यांच्या मृतदेहांना नाही वाली
लाड तयांचे झाले ज्यांना थोडेसे खरचटले होते

धीर कधीना खचला तरीही या सत्याची जाणीव झाली
शरीर थोडे थकले होते... पाय जरासे दमले होते

....कैलास गांधी

बेफिकीर's picture

ज्याच्या

ज्याच्या नाराजीने सध्या नवीन वादळ उठले होते
हे शोधा कि आधी त्याचे किती जणांशी पटले होते - व्वा!

पाय मोकळे झाल्यावरती उभा राहिला नवाच गुंता
सुटे, मोकळे होण्यामध्ये हात जरा गुरफटले होते - व्वा!

पुसू नका आरसे उगाचच तोंडावर मारत जा पाणी - सुरेख ओळ

लाड तयांचे झाले ज्यांना थोडेसे खरचटले होते - सुरेख ओळ

Vidyanand Hadke's picture

व्वा मतला आवडलाच

ज्याच्या नाराजीने सध्या नवीन वादळ उठले होते
हे शोधा की आधी त्याचे किती जणांशी पटले होते

व्वा मतला आवडलाच

9101112's picture

मनात कोणी

मनात कोणी कसून दारास ठोकणारे
कुलूप काढा अता, अशी प्रार्थना असावी
S10-201
310-813
000-105
मध्येच का पोकळीत झाली सजीवसृष्टी?
इथे मला संपवायची योजना असावी
640-864
000-M91
000-M78
लहान मोठ्या बऱ्याच आल्या, पसार झाल्या
जगायला एक चांगली यातना असावी

मनात आली, विषण्ण झाली, निघून गेली
सुधारण्याची निलाजरी वल्गना असावी
FCNSP
FCNSA
310-232
000-031
जपून माणूसकी उधळ या जगात भूषण
हपापली माणसे, तिची वंचना असावी
000-036
000-038
000-055
000-057

myjordanmax's picture

Jordan Shoes Air Jordan