हा सोहळा कुणाचा? [प्रश्नगझल]

जत्रेत काफिरांच्या गोतावळा कुणाचा ?
ही पालखी कुणाची हा सोहळा कुणाचा?
साधून डाव गेले ते पाहुणे कुणाचे?
गर्दीत आवळ्यांच्या तो कोहळा कुणचा?
कैफात आरत्यांच्या हा जोगवा कुणाचा?
तांड्यात मोगलांच्या तो मावळा कुणाचा?
दंग्यात सोयरेही का गाढ झोपलेले?
रक्तात माखलेला तो कोथळा कुणाचा?
हा दोष आंधळ्यांचा की डाव डोळसांचा?
पिंडीवरी शिटे जो तो कावळा कुणाचा?
बाजार मांडणारे का चूप राहिले रे?
लाचार पंढरीला तो सावळा कुणाचा?
[साप्ता.सकाळ,ऐसी अक्षरे,आदि अनेक अंकातून ]
--------संजय बोरुडे,अहमदनगर.
संपर्क :- 9372560518
9860056192
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
प्रश्नगझल
प्रश्नगझल म्हणजे काय? मला रचनेतील एकही द्विपदी समजली नाही. क्षमस्व! पण क्रान्तीकारक द्विपदी आहेत.
आपला प्रश्न
माझा संपर्क क्रमांकावर संपर्क केलात तर बर्यापैकी चर्चा करता येईल.
आभार.