भास आहे सर्वकाही...

प्रसाद's picture

भास आहे सर्वकाही...
जीवनाला अर्थ नाही

तो म्हणे सर्वत्र आहे
(भेट नाही एकदाही...)

शब्द सारे फोल होते
शांतता पण अर्थवाही...

पाठ फिरता पावसाची
मेघ उरले खिन्न काही

शेवटी येतो स्वतःशी
मी दिशा हिंडून दाही

जाणिवा का गोठलेल्या?
सत्य तर आहे प्रवाही!

स्वाती's picture

वा !

शब्द सारे फोल होते
शांतता पण अर्थवाही...

हा सर्वात आवडला.

मक्ता मात्र 'जमला' नाही मला तितकासा. सत्य प्रवाही आहे म्हणजे काय?

रसिक's picture

गझल्

गझल आवडली. छोट्या बहराची गझल छान झाली आहे.

काव्यात आढळणारर्‍या काही कल्पना येथे वेगळ्या मांडणीने आल्या आहेत.

मतला आणि 'तो सर्वत्र आहे' हे शेर खासच!
स्वाती,
सत्य प्रवाही- सत्य बदलत जाते, बहुमताने सत्य ठरते असे काही अर्थ त्यात असावेत.

Mavia's picture

For those of us not lucky

For those of us not lucky enough to be attending Phish's New Year's run at Madison Square Garden, today is a very good day as the band has announced plans to stream all three shows live. The full run will set you back $39.99 with the individual prices varying between $14.99 for Dec 30th and Jan 1st or the special New Year's Eve performance for $19.99. Not exactly dirt cheap but certainly a reasonable rate for what should be some fantastic shows.
ccna \ cissp tutorial \ ase certification \ braindumps oracle \ itil v3 certification \ mcp dumps \ ccsp \ comptia a+ \ comptia network+ \ comptia security+ \ microsoft mcp \ test king \ ccie dumps \ mcts training \ microsoft certification \ oracle certification dumps \ mcse 2008 \ ccna security \ ccna voice \ ccna wireless \ ccvp

george22's picture

I have been searching for

I have been searching for some information about the online community and accidentally I have noticed this headline. As I see, this site is full of more such great posts like this one so I will definitely bookmark it. Thanks a lot one more time.640-802 braindump || 640-816 dumps || 640-822 dumps || 640-864 braindumps || 642-062 dump || 642-072 dumps || free 642-145 dumps || 642-165 braindump ||

Mavia's picture

स्वाती,

स्वाती, कल्पना कळल्या नाहीत असे म्हणणे बरोबर आहे. काही ठिकाणी शब्दांची फेरफार विरामचिन्हे असे बदल वाचकाने करून घेतले तर शेर स्पष्ट होतील अशी अपेक्षा असावी.स्वाती, कल्पना कळल्या नाहीत असे म्हणणे बरोबर आहे. काही ठिकाणी शब्दांची फेरफार विरामचिन्हे असे बदल वाचकाने करून घेतले तर शेर स्पष्ट होतील अशी अपेक्षा असावी.स्वाती, कल्पना कळल्या नाहीत असे म्हणणे बरोबर आहे. काही ठिकाणी शब्दांची फेरफार विरामचिन्हे असे बदल वाचकाने करून घेतले तर शेर स्पष्ट होतील अशी अपेक्षा असावी. 000-115
70-573
70-643
1Y0-A15
646-230
HP0-S27
650-393
156-215-70
70-291
1z0-533
642-426
642-456
70-401
642-583
646-578
646-671
70-433
70-536
70-448
220-702

प्रसाद's picture

प्रवाही सत्य

स्वाती

The truth is dynamic / fluid / flowing, then why our perceptions of the truth are static असं म्हणायचं आहे!

प्रसाद...

विसुनाना's picture

प्रवाही सत्य

माझ्या मताप्रमाणे सत्य हे प्रखर, तेजस्वी, लाव्हयाप्रमाणे (किंवा लोखन्डाच्या रसाप्रमाणे) उकळते आहे. म्हणून ते वहातं - प्रवाही आहे.
पण आपल्या जाणीवा मात्र आपापल्या द्रु (इथे 'दृ' कसे लिहायचे असते?!!)ष्टिकोनाप्रमाणे बद्ध - पर्यायाने गोठलेल्या आहेत.
हे झालं माझं मत.
'प्रसाद' ची गझल फारच सुंदर आहे. आणखी हव्यात .. अशाच!

willim.smith's picture

इतक्या

इतक्या बारकाईने गझल कार्यशाळेतील गझलांचे रसग्रहण करून (गझलकार) कवियत्री स्वाती यांनी फारच मोलाची कामगिरी केली आहे. Drive Axle

essem's picture

सत्याबद्दल

-मला वाटतं स्वत: शायरानं आपली कल्पना स्पष्ट करायला हवी. कारण सत्य हे वस्तुत: अपरिवर्तनीय, शाश्वत असायला हवं. "बहुमतानं ठरतं ते सत्य? बदलत जातं ते सत्य?" हेच का कवीला अभिप्रेत आहे? जर असेल (किंवा जरी नसेल तरी) जाणिवांच्या संदर्भातलं सत्य ही कल्पना स्पष्ट करायला हवी कवीनं.

-सतीश

प्रसाद's picture

सत्य

सतीश

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...

सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की सत्य हे अपरिवर्तनीय / शाश्वत आहे आणि त्याबद्दलच्या आपल्या संवेदना / जाणिवा / कल्पना मात्र बदलत जातात... मात्र मी या शेरात contradictory view मांडायचा प्रयत्न केला आहे (जे मत पूर्णपणे चुकीचंही असू शकेल!). माझं या शेरामधे असं म्हणणं आहे की सत्य हे प्रवाही / बदलणारं / dynamic आहे.... मग ते जाणून घेण्यासाठी काम करणार्या आपल्या जाणिवा मात्र गोठलेल्या / static / frozen का?

येथे बहुमतानं ठरणारं ते सत्य असं मला कुठेच म्हणायचं नाही.... हा विचार संवेद्य सत्याच्या (perceived truth) बाबतीतच आहे.

रसिक's picture

बहुमत्- प्रवाह्

सत्य प्रवाही / बदलणार कस होईल याचा विचार केला तर प्रवाह आणि सत्य वळवणारी कारणे याचा संबंध लक्षात येतो. बहुमताने ठरणार सत्य हे आपल्याला अपेक्षित नसल तरी पूर्णपणे चुकीचे नाही. एकाच शेरातून अनेक अर्थपदर उलगडू शकतात ह्यात शेराच यश दडल आहे असे वाटत नाही का?

खुलास्याबद्दल आभार.

स्वाती's picture

'Fluid' सत्य

प्रसाद,
मेल केली आहेच, पण इथे चर्चा सुरू आहे म्हणून इथेही लिहीते.

तुझ्या 'fluid' सत्यावर अजून विचार करत्ये. :)
ज्या fluid सत्याचा निर्देश केला आहेस, ते जर 'संवेद्य' असेल, तर जाणीवा गोठलेल्या कश्या असतील?
सत्य बदलतं, perceptions बदलत नाहीत.. असं म्हणायचंय का?
म्हणजे उदा. माणूस बदलला तरी आपली त्याच्याबद्दलची मतं बदलत नाहीत.. असं?
यात गडबड मला अशी वाटते की सत्य आणि perception या मुळातच दोन पूर्णतः वेगळ्या (exclusive) गोष्टी नाहीत का?
सत्य हे शाश्वत, पण multidimentional असतं आणि perception ही एक सहसा तोकडी आणि rigid अशी frame of reference असते, हे पटण्यासारखं आहे. पण 'प्रवाही' मला झेपलेलं नाही अजून. :)

प्रसाद's picture

असं पहा...

आपल्या आयुष्यातल्या व्यक्ती, त्यांच्या सोबतची आपली नाती आणि आपल्या भोवतालची परिस्थिती... या तीनही गोष्टींमधे सतत बदल होत असतो... हे आपल्या भोवतीचं बदलणारं / प्रवाही सत्य... या बदलांबाबत आपल्या जाणिवा जागृत असायला हव्यात किंवा आपली संवेदनशीलता प्रखर असायला हवी... पण ते तसं होताना दिसत नाही असं काहिसं या शेरामधे म्हणायचं आहे!

चित्तरंजन भट's picture

सुंदर

सुंदर गझल. नेहमीच्याच कल्पना अगदी प्रभावीपणे, प्रवाहीपणे आणि प्रासादिकपणे मांडल्या आहेत. सारेच शेर आवडले. अर्थवाही शांतात, स्वतःशी दाही दिशा हिंडणे, खिन्न काही मेघ विशेष सुंदर.
मक्त्यात 'सत्य हे फ्लुइड असते', असे जे प्रसादला म्हणायचे आहे ते पटते. मक्त्यावरून शेर आठवला. त्या शेराचे ह्या शेराशी कुठलेही साम्य नाही. फक्त आठवला म्हणून देतो आहे. तो असा-

वक़्त की दहलीज़ पर जलता दिया कोई नहीं
सारे दर्या मुंजमिद, बहता हुआ कोई नहीं

मुंजमिद म्हणजे गोठलेले. दर्या म्हणजे नदी हे माहीत असेलच.

प्रसाद गझल फार-फार आवडली.

चित्तरंजन

प्रणव सदाशिव काळे's picture

शांतता पण अर्थवाही

शब्द सारे फोल होते
शांतता पण अर्थवाही...

शेवटी येतो स्वतःशी
मी दिशा हिंडून दाही

खूप आवडले.

जयश्री अंबासकर's picture

खूप छान !

प्रसाद, ही गझल सुद्धा खूप आवडली.
तो म्हणे सर्वत्र आहे
(भेट नाही एकदाही...)........ वा!

शब्द सारे फोल होते
शांतता पण अर्थवाही... अगदी नेमकं!

पाठ फिरता पावसाची
मेघ उरले खिन्न काही.........सगळ्यात आवडलेला शेर. कल्पनाच फार गोड आहे.

माणिक जोशी's picture

सर्वत्र.... फार आवडला !

शान्तता पण अर्थवाही... सहिच !
पाठ फिरता... जमूनच गेला रे अगदि !
प्रवाही... हा पण अगदि आर पार केलायेस !

खूप खूप आवडली रे !

केशवसुमार's picture

वा..

प्रसादशेठ,
एकदम झकास गझल..
साधी-सोपी..खुप आवडली
आमचा एक खोडकर प्रतिसाद इथे वाचा

केशवसुमार

मीनु's picture

वाह प्रसाद , क्या बात है..

सुंदर ..
सगळेच शेर पुन्हा लिहायला लागतील आवडलेले लिहायचे तर...

वैभव's picture

मस्त

फार सुंदर जमलीये प्रसाद. सहीच !!!

मानस६'s picture

प्रभावी आणि प्रासादिक

प्रभावी आणि प्रासादिक..तुझ्या नावाप्रमाणेच ...लिखते रहो...
मानस ६

चिन्नु's picture

आवडेश!

मीनुशी सहमत. गजल सहज आणि प्रवाही वाटली.

चिन्नु

michaeljii's picture

स्वाती,

स्वाती, कल्पना कळल्या नाहीत असे म्हणणे बरोबर आहे. काही ठिकाणी शब्दांची फेरफार विरामचिन्हे असे बदल वाचकाने करून घेतले तर शेर स्पष्ट होतील अशी अपेक्षा असावी.स्वाती, कल्पना कळल्या नाहीत असे म्हणणे बरोबर आहे. काही ठिकाणी शब्दांची फेरफार विरामचिन्हे असे बदल वाचकाने करून घेतले तर शेर स्पष्ट होतील अशी अपेक्षा असावी.स्वाती, कल्पना कळल्या नाहीत असे म्हणणे बरोबर आहे. काही ठिकाणी शब्दांची फेरफार विरामचिन्हे असे बदल वाचकाने करून घेतले तर शेर स्पष्ट होतील अशी अपेक्षा असावी.
642-971 | 642-145 | 1z0-007 | 642-481 | 642-611

johnhungry's picture

स्वाती,

स्वाती, कल्पना कळल्या नाहीत असे म्हणणे बरोबर आहे. काही ठिकाणी शब्दांची फेरफार विरामचिन्हे असे बदल वाचकाने करून घेतले तर शेर स्पष्ट होतील अशी अपेक्षा असावी.स्वाती, कल्पना कळल्या नाहीत असे म्हणणे बरोबर आहे. काही ठिकाणी शब्दांची फेरफार विरामचिन्हे असे बदल वाचकाने करून घेतले तर शेर स्पष्ट होतील अशी अपेक्षा असावी.स्वाती, कल्पना कळल्या नाहीत असे म्हणणे बरोबर आहे. काही ठिकाणी शब्दांची फेरफार विरामचिन्हे असे बदल वाचकाने करून घेतले तर शेर स्पष्ट होतील अशी अपेक्षा असावी.
chicago real estate // los angeles real estate // home loans // orlando homes for sale // online trading // unsecured loans // forex // secured credit cards // discover card // citi cards

miketyson986's picture

स्वाती,

स्वाती, कल्पना कळल्या नाहीत असे म्हणणे बरोबर आहे. काही ठिकाणी शब्दांची फेरफार विरामचिन्हे असे बदल वाचकाने करून घेतले तर शेर स्पष्ट होतील अशी अपेक्षा असावी.स्वाती, कल्पना कळल्या नाहीत असे म्हणणे बरोबर आहे. काही ठिकाणी शब्दांची फेरफार विरामचिन्हे असे बदल वाचकाने करून घेतले तर शेर स्पष्ट होतील अशी अपेक्षा असावी.स्वाती, कल्पना कळल्या नाहीत असे म्हणणे बरोबर आहे. काही ठिकाणी शब्दांची फेरफार विरामचिन्हे असे बदल वाचकाने करून घेतले तर शेर स्पष्ट होतील अशी अपेक्षा असावी.

tag heuer watches|timeक्ष watches|gucci watches|swatch watches|diesel watches|guess watches|dkny watches|rado watches|tissot watches|hamilton watches

michaeljii's picture

Great Post

ट्his post is really the sweetest on this notable topic. I harmonise with your conclusions and will thirstily look forward to your incoming updates. Saying thanks will not just be sufficient, for the phenomenal clarity in your writing. I will directly grab your rss feed to stay informed of any updates. Admirable work and much success in your business dealings!? Please excuse my poor English as it is not my first tongue.
watches|men's watches|ladies watches|rolex watches|fossil watches|citizen watches|casio watches|movado watches

Regards,
MichaeL || IT Consultants || NYC.USA