सचिन म्हैसकर's picture

व्रुत्तांचे प्रकार व उदाहरणांसहित माहिती मिळेल का?

व्रुत्तांचे प्रकार व उदाहरणांसहित माहिती मिळेल का?

बहर's picture

तू चुकावे, अन सदा समजून घ्यावे मी!!

तू चुकावे अन सदा समजून घ्यावे मी!!
हे गनीमांचेच "कावे" का बघावे मी?

पोचुनी क्षितीजावरी का थांबणे झाले?
उमटलेल्या पावलांना का बघावे मी?

बंद दारे, आणि खिडक्या, अन कवाडे ही...
तूच दे ना वाट, कुठुनी आत यावे मी?

निशिकान्त्'s picture

भाग्य माझे केवढे!

जाहला स्म्र(smru)तीभ्रंश मजला भाग्य माझे केवढे!
आठवांचे पाश आता घालती ना साकडे
काय होतो काल मी अन कोण माझे सोयरे?
सर्व ते तिमिरात लपले मज कुणी ना सापडे
माय मजला ही असावी आठवेना ती कशी?
तिजविना मज छत्र कोठे? काळजा जाती तडे

निशिकान्त्'s picture

रंग चल देऊत का?

प्राक्तनी नसली जरी ती पोर्णिमा रेखूत का?
आवसेला पांढरासा रंग चल देऊत का /
का उगा कष्टी असावे? साथ दु:खाची सदा
वाहू दे डोळ्यास, ओठी हास्य चल फुलवूत का?
गोठले आयुष्य सारे थंड निपचित देह हा
उष्ण झरत्या आसवांचा शेक चल घेऊत का?

निशिकान्त्'s picture

शब्द तू जुळवून दे

तान माझी हरवलेली तू जरा शोधून दे
गीत मी आता विसरलो शब्द तू जुळवून दे
लय हरवली तार तुटली मूक वीणा जाहली
छेडण्या झंकार ह्रदयी तार तू जोडून दे
जळमटे ही आठवांची अडकलो मी का असा?
छानशी स्वप्ने उद्याची तू मला दावून दे

निशिकान्त्'s picture

आसवे गळती किती? [मुसलसल गझल]

दोन पुतळे म्लान त्यांचे चेहरे दिसती किती?
पंचधातू संगमरमर आसवे गळती किती?
एक गांधी त्यात होते सांगती दुस-यास ते
आपणा केले उभे का? प्रश्न हे छळती किती?
भोवताली मद्य विक्री मास ही विकते इथे
हेच का फळ मम तपाला? भावना सलती किती?

Vidyanand Hadke's picture

माय मराठी बोलत राहू...

एक नवा प्रयोग म्हणून ही गझल आपणा सर्व दिग्गजां समोर सादर करण्याच धाडस करत आहे,
निश्चितच आपण सर्व जाणकारांचे मार्गदर्शन अपेक्षित आहेच...

रखकर दिलपर पथ्थर संकट झेलत राहू
जगण्याची मग रीत जगाला सांगत राहू

संजय बोरुडे's picture

जबाब

इतकाच जिन्दगीचा माझा हिसाब होता
उरला अखेर हाती खोटा नकाब होता..

फुलता वसंत येथे हैराण बाग झाली
बहरात रोपट्याला काळा गुलाब होता..

नव्हताच शाप त्यांना केव्हाच गंजण्याचा
पण हाय रे जमाना त्यांचा खराब होता..

निशिकान्त्'s picture

शिंपडावे तू कधी

पेटलेल्या भावनाना शातवावे तू कधी
पोर्णिमेच्या चांदण्याला शिंपडावे तू कधी
काय म्हणती लोक याची वाटते भिती तुला
होउनी निर्भिड स्वप्नी वावरावे तू कधी
टोचता पायात काटा नेत्र अश्रू गाळती
जाणुनी मम एकलेपण हळहळावे तू कधी

सचिन म्हैसकर's picture

एकरुप

कागदे माझी वाच जराशी!
लपेटून घेशील उराशी!

चमचमता बंगला दिसे
पण मी प्रामाणिक घराशी!

शाप तुझे ते मनापासुनी
तुलना त्यांची दैवी वराशी!

जेथे जुळती मने मनाला
कर जुळती तेथे कराशी!

घेती भरारी गगनावरी
अंती पाखरे येती धराशी!

Syndicate content