Vidyanand Hadke's picture

माणसास मी अता जरासा जाग म्हणालो...

माणसास मी अता जरासा जाग म्हणालो
आळसास या खुंटीवरती टांग म्हणालो

तुकड्यावरती जे इवल्याश्या भुलून गेले
माणसास त्या मी मुंग्यांची रांग म्हणालो

सौख्य शोधता पदोपदी मज दु:ख भेटले
अन दु:खाला मी सौख्याचा भाग म्हणालो

निशिकान्त्'s picture

गजला मधुनी

हसणे हसतो रडणे रडतो गजला मधुनी
ओघळणारे अश्रू पुसतो गजला मधुनी
सारे माझे मी सा-यांचा मान्य जरी मज
माझ्या पासुन मीच हरवतो गजला मधुनी
माझे गाणे वा रडगाणे माझे आहे
मूकपणाने मी गुणगुणतो गजला मधुनी
दार जरी मज बंद जगाचे, देवा घरच्या

बहर's picture

हात दे हातात....

हात दे हातात आता
चालुया ही वाट आता

त्याच स्वप्नांची नव्याने
घालुया रुजवात आता!

संपवू कोठे कथा?
कोठे करू सुरवात आता?

ही मिठी सोडू नको..
सरली जरी बरसात आता!

मोगरा कोमेजला पण..
दरवळे श्वासांत आता!

वाट मी पाहू किती?

कमलाकर देसले's picture

हे खरेच जगणे....

हे खरेच जगणे अवघड झाले आता
सोन्याचा होता धूर नको त्या बाता

तो धूर आजही आहे, त्या महालात
गोवऱ्या चुलींना इथे पारख्या आता

त्या तिथे उंची पेये पाण्याजागी
डोळ्यातील येथे अश्रू आतले आता

एकास एकसे कपडे आलामारीत

तुशार देसले's picture

तुझ्या वहीमध्ये....

तुझ्या वहीमध्ये,माझे मोरपीस
आणि माझे श्वास,सोबतीला

तुझ्या वहीमध्ये,गुलाबाचे फुल
बांधणार पुल,संवादाचा

तुझ्या वहीमध्ये,मीच पानोपानी
अजिंठ्याची लेणी,कोरलेली

तुझ्या वहीमध्ये,नि:शब्दाचं गाणं
माझी ओळखुन,मोरपंखी

कमलाकर देसले's picture

मुक्त आकाश...

गरज बरस रे पावसा रोखुन सगळा श्वास
कळ्ले ना तुज सांग कसे भिजते ना आकाश

क्रोधाने रवी बोलला भस्म करीन अवकाश
तो तर जळतो आजही जळले ना आकाश

धुळ बोलली करीन मी चारित्र्याचा र्‍हास
धुळ धुळीला मिळली पण मिळले ना आकाश

बहर's picture

कैफ त्या डोळ्यातला..

कैफ त्या डोळ्यांतला पाहून जो तो चूर होता..
रंगलेल्या मैफिलीचा आगळा तो नूर होता!

त्या कटाक्षाने नशा चढली असावी वेगळी ही...
तो रिता पेला खरेतर ठेवला मी दूर होता!!

पाहिले सांगून खर्जातून जेव्हा सत्य ते मी

बहर's picture

सुखाच्या सर्व व्याख्यांना जरा बदलून पाहू या!

सुखाच्या सर्व व्याख्यांना जरा बदलून पाहू या..
चला, केव्हांतरी आयुष्यही जवळून पाहू या!!

दिव्या, पंख्याविना वातानुकूलीत हे असे जगणे..
चला अंधार पाहू या, जरा निथळून पाहू या!!

किती उपकार मानावे, अता ह्या भार नियमांचे?

गंगाधर मुटे's picture

मुकी असेल वाचा

मुकी असेल वाचा

कसा वाजवू टाळी, मी देऊ कशी दाद?
पहिला चेंडू छक्का, दुसर्‍या चेंडूत बाद

तुझे-माझे जमले कसे, करतो मी विचार
भाषा तुझी तहाची, मला लढायचा नाद

विसरभोळा असे मी सांगतो वारंवार
भूल पडते देणींची, घेणे असते याद

सचिन म्हैसकर's picture

अर्थ

काळीज माझे चितेविणा जेव्हा जळाया लागले!
खर्‍या प्रितीचे अर्थ तेव्हा मला कळाया लागले!

दैवत काळजाचे तुला मानुनी केली मी पुजा
हेच ते पुण्य जे पाप बनुनी छळाया लागले!

जाचातुनी जात्याच्या माझी अजुन सुटका नाही

Syndicate content