पुढे चला रे...

गंगाधर मुटे's picture

पुढे चला रे....

चेतलेल्या तेलवाती, शांत नाही
चालतांना वाट ही, विश्रांत नाही.

नेमलेले लक्ष्य, आवाक्यात आहे
ना तमा वा सावजाची, भ्रांत नाही.

वेदनांची पायमल्ली, फार झाली
झुंज शौर्याने, अर्जी आकांत नाही.

एकदा घेच, अजमावूनी लढाई
सोक्षमोक्षाविन अता, मध्यांत नाही.

घे भरूनी पोतडी, दोन्ही कराने
हा विरक्ती साधकाचा, प्रांत नाही.

.गंगाधर मुटे.

बेफिकीर's picture

वेदना

वेदनांची पायमल्ली फार झाली - छान ओळ!

(मीटर काही ठिकाणी वेगळे आले असावे.)

शुभेच्छा!