कुठे म्हणालो परी असावी

माझा हा इथला पहिलाच प्रयत्न आहे. मार्गदर्शनाबद्दल आभारी राहीन.
कुठे म्हणालो परी असावी
मनाप्रमाणेतरी असावी
हवा कशाला प्रचंड पैसा
जगायला नोकरी असावी
तरूस आधार होत जावी
अशी कुणी वल्लरी असावी
नको अवाढव्य राजवाडा
निजायला ओसरी असावी
नको दिखाव्यास गोड गप्पा
मनात प्रीती खरी असावी
- प्रणव सदाशिव काळे
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
वा वा!!
अतिशय साधी आणि सहज गझल! मस्तच. सर्वच शेर आवडले. "माफक अपेक्षा आहेत, त्यातरी पुर्या व्हाव्यात" हा आशय किती छान उमटलाय!! खूप खूप शुभेच्छा..
-- पुलस्ति.
सहमत आहे
छान आहे गझल.
तरूस आधार
तरूस आधार होत जावी
अशी कुणी वल्लरी असावी... वा...
वाह !
मतला फार म्हणजे फार आवडला. बाकीचेही शेर सही. मस्त !!!
सही!
प्रणव....... खूपच सुरेख आहे रे ! खूप निरागस!
मतला एकदम जबरी.
नको अवाढव्य राजवाडा
निजायला ओसरी असावी....... मस्त मस्त!
वैभव, स्वाती.... अशा गझलेला काय म्हणतात...म्हणजे इतक्या छोट्या मीटरला? मनापासून आवडलं हे सुबक मीटर.
वा!
गझल फार म्हणजे फार आवडली! साधी, सोप्पी, सरळ घुसणारी गझल!
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
वा!!
मतल्यापासून मक्त्यापर्यंत म्हणजे नखशिखान्त आवडली ही गझल. :)
मनाप्रमाणेतरी असावी
वा, सुंदर मतला. गझल अगदी सफाईदार आणि ओघवती. छानच!
छान मित्रा
साध्या सरळ शब्दात ..............थेट मनाला भावनारी गजल
सहज आलेली
वा.. सचिनच्या सहज सुंदर फटक्यासारखी ..
मानस ६
ही घ्या भरभरून दाद
हमखास दाद आली हो वाचतांना.
अप्रतीम गझल. वाहवा.
छोटी बहर. नेमके शब्द.
खोल अर्थ. चपखल शब्द योजना.
वा.
तुषार जोशी, नागपूर
अप्रतीम
अप्रतीम गझल
प्रणव... किती सहज किती सुन्दर !
तरूस आधार होत जावी
अशी कुणी वल्लरी असावी... प्रचन्ड आवडला !
नको दिखाव्यास गोड गप्पा
मनात प्रीती खरी असावी... आता कस !
खूप सहज अन सुन्दर रचना !
वा प्रणव,
एकदम खास. वल्लरीने तरुला आधार देण्याची कल्पना भन्नाट. गझलेचं सोपं, थेट भिडणारं रुप आवडलं. अजून येऊ देत अशाच सुंदर गझला.
सहज सुंदर!!!
प्रणव, साधी सोपी म्हणूनच सुंदर!!! मस्त...
आभार
माझ्या रसिक मित्रमैत्रिणींनो, माझ्या छोट्याश्या गझलेला तुम्ही भरभरून दाद दिलीत, मनःपूर्वक आभार.
व्वा
व्वा! किती सहज.
मेघा
अगस्ती
सुंदर अप्रतिम गझल
शुभेच्छा
==अगस्ती
गोड आहे गजल!
साधे सोपे शब्द, छोटा मीटर.. तरीही थेट पोचत आहे..
लिहत रहा..
व्वा, छान
व्वा, छान आहे ही गझल.
अर्थ पूर्ण
छोटी छोटी वाक्य आणि
एकदम लयबध्द
सुंदर
सुधीर
पोटापुरता
पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी ची आठवण झाली, प्रणव. पण ही कविता थोडी मिश्कीलही वाटली. सुंदर!
-सतीश
वा!
सुंदर गझल आहे. साधी सोप्पी आणि जराशी मिश्किलही!
सुंदर
प्रणव,
अप्रतिम गझल... अगदी साधी-सोपी पण प्रभावी शब्दरचना.
कुठे म्हणालो परी असावी
मनाप्रमाणेतरी असावी
हवा कशाला प्रचंड पैसा
जगायला नोकरी असावी
हे शेर, निजायला ओसरी आणि प्रीती खरी हे शेर अतिशय आवडले.
- कुमार्
सुंदर
प्रणव,
अप्रतिम गझल... अगदी साधी-सोपी पण प्रभावी शब्दरचना.
कुठे म्हणालो परी असावी
मनाप्रमाणेतरी असावी
हवा कशाला प्रचंड पैसा
जगायला नोकरी असावी
हे शेर, निजायला ओसरी आणि प्रीती खरी हे शेर अतिशय आवडले.
- कुमार
वा !
नको अवाढव्य राजवाडा
निजायला ओसरी असावी
सुंदर !
वा ! गझल आवडली
अजय
वा..
प्रणवशेठ,
झकास गझल.. साधी, सोप्पी, सरळ गझल!
पु.ले.शु.
आमचा अजून खोडकर प्रतिसाद इथे वाचा
केशवसुमार
ओघवते
मतला मस्त आहे, ओघवता आहे. शेर सहज आले आहेत. गझल आवडली.