वृत्ताविषयी...

गझल लिहिण्यासाठी आपण स्वत: एखादे नवे वृत्त तयार करून गझल लिहू शकतो का?
तसे शक्य असल्यास वृत्त निर्मितीसाठी कोणते नियम पाळावे लागतात? किंवा पारंपारिक वृत्तातच लिहिणे बंधनकारक आहे?
अभिप्रायाची प्रतिक्षा करतोय...
--आपले आभाळ :)
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
करता येतं
आपल्याला हवं तसं वृत्त तयार करता येतं पण ते काम जिकिरीचं आहे हे खरं .
पारंपारिक वृत्तातच लिहायला पाहिजे असं नाही. पण नवीन तयार करताना त्याचे यती , त्यातील माधुर्य , वजन ह्या गोष्टी सांभाळाव्या लागतात .
जरूर लिहू शकतो
गझल लिहिण्यासाठी आपण स्वत: एखादे नवे वृत्त तयार करून गझल लिहू शकतो का?
नक्कीच लिहू शकता. शेवटी वृत्ते ही कवींनीच घडवलेली आहेत. आणि वृत्त म्हणजे काय शेवटी? लघू-गुरूचे ('लगा'चे) परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. हजारो वृत्ते बनू शकतात.
वृत्तनिर्मितीपेक्षा काव्यनिर्मितीवर ध्यान केंद्रित करणे कधीही चांगले असे माझे मत आहे.
वृत्तनिर्मितीसाठी कुठलेही बंधन नाही. पण तुम्ही घडविलेल्या वृत्तात कविता लय असल्यास उत्तम. उगाच अट्टाहास, कलाकारी-कारीगरी दाखविण्यासाठी म्हणून क्लिष्ट वृत्ते घडवण्यात अर्थ नाही.
वैभव,
प्रत्येक वृत्तात यती असेलच असे नाही. छोट्या वृत्तांत बरेचदा यती कुठे येतो?
जीवनाला शेवटी हारून मी
टाकले आयुष्य झिडकारून मी
ह्या नितीन भट ह्यांच्या गझलेत यती कुठे घ्याल? समान मात्रांचे तत्त्व कुठे लावणार?
उत्तरे कळलीच तर कळवा मलाही :)
चित्तरंजन
यती ????
वैभव, चित्त, यती म्हणजे काय?
यती नाही??
गालगागा | गालगागा | गालगा
इथे दोन आले ना?
समान मात्रांचं कसलं तत्त्व?
तीन-चारही येऊ शकतात:)
गालगागा | गालगागा | गालगा
इथे दोन आले ना?
माझ्या मते इथे यती घेण्यावर आहे. यती म्हणजे काय शेवटी? 'थांबा'. (बसच्या थांब्याप्रमाणे) गुणगुणताना, वाचताना जिथे योग्य वाटते तिथे घेऊ शकतो.
राधिका ताराप गागा | राधिका
असे का नाही? असेही घेऊ शकतो.
राधिका गागा | यमाचा राधिका
असे का नाही ?
किंवा
राधिका| ताराप गा | ताराप गा
असे का नाही?
समान मात्रांचं कसलं तत्त्व?
स्वाती, कसलंच तत्त्व नाही, तेच म्हणतो आहे आधीपासून. ´गझल आणि मीटर´ह्या चर्चेतील सारंग ह्यांचा प्रतिसाद आणि माझा उप-प्रतिसाद आपण वाचावा.
चित्तरंजन
मीटर आणि यती
पहिल्या गालगागा नंतर म्हणजे ७ मात्रांनंतर पहिला यती येतो असे वाटते.
सगळ्यात महत्त्वाचे...
एकदा कविता किंवा गझल, लयीत (मीटर मध्ये) आहे असे म्हटल्यावर त्यात यती नाही असे म्हणणे चूक ठरेल. यतींशिवाय कुठलेही काव्य सुरात, ताला, लयीत म्हणताच येणार नाही असे वाटते.
कळावे
सारंग.
मीटर म्हणजे लय की वृत्त?
सारंग, मीटर म्हणजे लय की वृत्त?
असो.
एकंदर
गालगागा | गालगागा | गालगा|
असे जागोजागी वाचले आणि इथे वृत्तांची चर्चा उर्दू वळणाने (फाइलातुन, फाइलातुन, फाइलुन टाइप) जाते आहे असे वाटले.:):)
नव्याने गझल लिहिणाऱ्यांसाठी ह्या यतीचा बागुलबुवा करायला नकोच. गझल नको, पण यती आवर असे व्हायचे. कवींनी ह्या यती-बितीकडे फारसे लक्ष देऊ नये असे माझे स्पष्ट मत आहे.
गझल नको... : ) :)
चित्त साहेब.... "गझल नको पण यती आवर" ... हाहाहाहाहाहाहाहा :) :) भयंकर हसलो :)
वृत्त
प्रत्येक गज़ल ही स्वत:चं वृत्त घेऊनच जन्माला येत असते. ते पारंपारिक असावं असं काही नाही. पण पारंपारिक वृत्ते ही काळाच्या कसोटीवर उतरली असल्यामुळे त्यातला गोडवा हा अनेक युगे अनुभवला असल्यामुळे ती जास्त गोड वाटतात/ असतात.
---अगस्ती
प्रत्येक
प्रत्येक गज़ल ही स्वत:चं वृत्त घेऊनच जन्माला येत असते. ते पारंपारिक असावं असं काही नाही. पण पारंपारिक वृत्ते ही काळाच्या कसोटीवर उतरली असल्यामुळे त्यातला गोडवा हा अनेक युगे अनुभवला असल्यामुळे ती जास्त गोड वाटतात/ असतात.
---अगस्ती 642-617 firewall
640-461 ICOMM
642-426 TUC
642-974 DCNIS-2
642-262 IUC
646-985 DCNSS
SNRS 642-504
642-524 SNAF
640-460 IIUC
646-046 ARSAM
650-195 SMBEN
642-681 AWLANSE
650-251 LCSAUC
642-072 CUDN
642-437 CVOICE
650-568 WSFE
646-656 WAASAM
गझल
गझल लिहिण्यासाठी आपण स्वत: एखादे नवे वृत्त तयार करून गझल लिहू शकतो का?
तसे शक्य असल्यास वृत्त निर्मितीसाठी कोणते नियम पाळावे लागतात? किंवा पारंपारिक वृत्तातच लिहिणे बंधनकारक आहे?
अभिप्रायाची प्रतिक्षा करतोय... testking 642-165 | testking 642-185 | testking 642-262 | testking 642-357 | testking 642-359 | testking 642-374 | testking 642-384 | testking 642-415 | testking 642-427 | testking 642-437 |