पानझड

दीपक माईणकर's picture

चैत्रामध्ये तुझी पानझड होते आहे
भूमी माझी अशी क्षारपड होते आहे

भेटून गेलो आपण रात्री स्वप्नामध्ये
तुझीया गावी आता ओरड होते आहे

भेटशील का अतातरी तू मला नव्याने
शेवटची ही माझी धडधड होते आहे

सुर्यास बोललो मी, चंद्रास ऐकले मी !
(तुझे बोलणे भारी बोजड होते आहे !)

फुटतील आता पुन्हा मजला पंख नवे
केव्हाची ही माझी फडफड होते आहे !