धागे

माझे नि तुझे धागे जुळले कधीच नव्हते
रे जीवना, तुला हे कळले कधीच नव्हते
येता वसंत दारी, फुलले पुन्हा निखारे
ग्रीष्मातही अशी मी जळले कधीच नव्हते
मी सोसते अजूनी छळ का तुझ्या व्यथांचा?
माझ्या विवंचनांनी छळले कधीच नव्हते
दारी तुझ्या कशा या पाऊलखुणा माझ्या?
पाऊल त्या दिशेला वळले कधीच नव्हते
डोहात काळजाच्या मी दडविले उसासे
माझे अबोल अश्रू ढळले कधीच नव्हते
मी कालच्या चुकांची चिंता करू कशाला?
ते भोग प्राक्तनाचे टळले कधीच नव्हते
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
सुंदर. तिसर
सुंदर.
तिसर्या शेरामध्ये छळ ची पुनराव्र्उत्ति टाळता यावी असे वाटते.
आशय
या रचनेतील आशय आवडला.
( व्रुत्तात लिहावेत अशी एक इच्छा! )
धन्यवाद
अल्काताई आणि भूषणजी, धन्यवाद. व्रुत्तात लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करीन.
संपूर्ण
संपूर्ण गझल आवडली...
मी व्रुत्त बारकाईने पाहिले नाहीये...
एकाच वाक्यात सांगायचं तर 'थेट पोचलेली' गझल आहे...
शुभेच्छा...
वा !! क्या
वा !! क्या बात है!
-हरीश