पैंजण

आपल्याला सारं कळतंय पण
या हातावरच माजलंय तण
कशास इतके गोड बोलता
उगाच मज आठवे बालपण
गडे विसरलो तुझा चेहरा
स्मरती केवळ मजला पैंजण
म्हणू लागल्या घरास भिंती
"नको इथे हा मधेच धारण!"
दिशाहीन नभ फिरते आहे
अन ता-यांची उगाच वणवण
सुखात मी झोपतो कुठेही
तुलाच होते रोज जागरण
तुझीच वचने तुझ्याच शपथा
केवळ मी हसल्याचे कारण!
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
आशय
आपल्या 'रचनेतील' आशय आवडला. ही रचना आपल्या तांत्रिकद्रुष्ट्या गझल करता येईल असे वाटते.
मस्त
मस्त आहे एकदम !!!!!
ही आहे खरीखुरी गझल ,आणि जेव्हा गझल ,गझल असते तेव्हा तिचा आशय हा चांगलाच असतो ..
तांत्रिकद्रुष्ट्या गझल करणारे किंवा तसा सल्ला देणारे गझलाकारच आहेत याचे वाईट वाटते .....
श्री. धनंजय भावलेकर
जे माझ्या बाबतीत सुरुवातीला घडले ते इतरांच्या बाबतीत घडू नये हे मी प्रकर्षाने पाहतो. मला जेव्हा तंत्र म्हणजे काय हे माहीत नव्हते व गझल तंत्रात असल्याशिवाय ती रसास्वादासाठीही अपात्र ठरते हे माहीत नव्हते तेव्हा माझ्या तथाकथित रचनांवर टीका व्हायची व माझी रचना बाद ठरवली जायची. आता त्याबाबतीतील धोरणे जरा सौम्य झाली असावीत असा माझा कयास आहे.
या संकेतस्थळावर मात्र अशा चर्चा किंवा झोंबणार्या टीका किंवा रचना अगदीच बाद करून टाकण्याचे प्रकार मी फारसे पाहिले नाहीत.
म्हणूनच, एखादी रचना जर तांत्रिकद्रुष्ट्या गझल नसेल तर त्या कवीला वाईट वाटू नये म्हणून मी आधी त्यातील चांगली बाब लिहितो व नंतर माझे मत सकारात्मक पद्धतीने सांगतो. ( मी मतच देऊ नये असे आपले मत असेल तर बाब वेगळी! )
पण त्यावरून जर आपण 'वर मांडली आहेत तशी मते' मांडणार असाल व माझा चांगुलपणा लक्षात न घेता माझ्यावरच वाटेल ते मतप्रदर्शन करणार असाल तर मी आपल्याला स्पष्ट सांगतो की: ( ही मते मी मुळीच मांडली नसती, पण आपण उद्युक्त केलेत. )
1. इतरत्र ही रचना सरळ सरळ विचाराधीन झाली असती कारण त्यात मात्रा दोष आहेत.
2. आशय ठीक आहे.
3. ही मुळीच खरीखुरी गझल नाही. ही 'खर्याखुर्या' गझलेपासून बरीच दूर आहे.
4. गझलकार हे तंत्राबद्दल बोलणारच! कारण गझल ही मूलभूतरीत्या एक तंत्रशुद्ध रचना असावीच लागते. हे याच 'स्क्रीन' च्या वरील बाजूस 'मराठी गझलचे निर्माते सुरेश भट यांची जी बाराखडी दिली आहे' त्यात आपल्याला दिसेल. मग आपल्याला म्हणायचे असेल तर जरूर म्हणा की भटांनी तंत्राचा उगीचच आग्रह धरला.
5. आपल्याला तंत्र माहीत नाही असे स्पष्ट लक्षात येत आहे. त्यामुळे आपले मतप्रदर्शनही 'विचाराधीन' करावे असे माझे मत आहे.
धन्यवाद!
दिशाहीन नभ
दिशाहीन नभ फिरते आहे
अन ता-यांची उगाच वणवण
वा... छान आशय...