कधी कधी

सुखात मी अशी फ़ुलून येते कधी कधी
अश्रुंची वाट मोकळी करते कधी कधी
शिवून घेते जखमा मी बेमालूमपणे
हास्याचा अंगरखा पांघरते कधी कधी
गर्दीत गजबजलेल्या हरवताना मी
एकांताच दान मागते कधी कधी
पापण्यांची स्वप्न बिखरताना मी
डोळ्यांची समजूत घालते कधी कधी
जगता न आले कधी इथे मनाप्रमाणे
ढग होऊन मग मीच कोसळते कधी कधी
मीना जामनिक
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
छान
छान आहे.
शेवटचा शेर आवडला.
डोळ्यांची
डोळ्यांची समजूत घालते कधी कधी - मस्त कल्पना....