आजनंतर

बेफिकीर's picture

आणू नको कधीही तसले मनात काही
आहे, तुझाच आहे, सध्या जगात नाही

ताब्यात जन्म नाही, ताब्यात अंत नाही
संपायची कधी ही एकाधिकारशाही?

माझ्या मनात येते की मी तुला म्हणावे
"संबंध काय आहे माझा तुझा तसाही?"

प्रत्येक दु:ख माझे जेव्हा बनेल शाई
होतील शब्द सारे साधेसुधे, प्रवाही

देवा नवीन दे वा मन हे दुरुस्त कर तू
जो भेटतो मला, हे, त्याचाच भार वाही

ते लाभता हवेसे, होते नकोनकोसे
आहे कुणाकुणाचा हा थाट बादशाही?

जा तू खुशाल वेडे, सबबी नकोत आता
होतोच ना असाही? राहीन मी कसाही!

’हातात येत नाही, वाटेत येत नाही”
माझी दिशा नसावी तुमच्या दिशांत दाही

नाही कधीच झाले ते आज होत आहे
नक्कीच आजनंतर येणार श्वास नाही

क्रान्ति's picture

सही गझल!

प्रत्येक दु:ख माझे जेव्हा बनेल शाई
होतील शब्द सारे साधेसुधे, प्रवाही
वा! क्या बात है! सगळेच शेर खास, पण हा अगदी अंतरातला!

क्रान्ति

कर्णिक मुकुंद's picture

केवळ अप्रतिम !

कुठला शेर आवडला म्हणू?
सारेच अप्रतिम आहेत. केवळ अप्रतिम !!

बेफिकीर's picture

वैभवची एक कल्पना

होतोच ना असाही राहीन मी कसाही - या ओळीत वैभवने केवळ एका अक्षराचा बदल सुचवला, पण उत्तम बदल व स्वीकारण्यालायक बदल!

होतोच ना असाही च्या ऐवजी होतोच ना तसाही - कारण तसाही हा शब्द जास्त मराठी शैलीचा असून 'असाही' हा 'ऐसेभी' या हिंदी शैलीचा आहे. तसाहीमधे छटा आहे जी असाही मधे येत नाही. असाही जास्त आक्रमकही वाटतो. मी जरी वरील गझलेत तो बदल करत नसलो ( कारणे वैयक्तिक आहेत ) तरीही हा बदल निश्चीतच चांगला आहे. वैभवचे धन्यवाद!

मुकुंदराव व क्रान्ति आपल्या दोघांसाठी -

बहुतेकांना दु:ख शाई होण्याचा शेर आवडला. परंतू या गझलेतील माझ्यामते सर्वात चांगला ( हेही वैयक्तिकच मत, गझलच काही विशेष नाही असेही माझे मत आहे व ते काहींना पटेलही. ) शेर आहे: ( खरे तर एक ओळच चांगली आहे. )

जा तू खुशाल वेडे, सबबी नकोत आता
होतोच ना अ ( त ) साही, राहीन मी कसाही

यात, प्रेयसी कायमची दूर जाण्याचे दु:ख कवीला वाटत असतानाच ती त्याला सांगायला आली आहे की तिची त्याला सोडून जाण्याची काय काय कारणे आहेत. पण मुळात ती तिथेच असतानाच ती कवीकडे इतके दुर्लक्ष करायची की कवीला ती आहे काय अन नाही काय एकच झाले होते. म्हणून त्याला आता असे वाटत आहे की त्या सबबी ऐकून काय मोठा फरक पडणार आहे? त्याची परिस्थिती तीच राहणार!

याच गजलेत मला आवडलेला आणखी एक शेर :

ते लाभता हवेसे, होते नकोनकोसे
आहे कुणाकुणाचा हा थाट बादशाही?

एखाद्या राजपुत्राला जसे नवनवीन खेळणे आणल्याआणल्याच लगेच नकोसे होते ( कारण तो राजपुत्र असल्यामुळे त्याची कुठलीही इच्छा सहज पुर्ण होत असल्यामुळे त्याला त्याची काही किंमतच नसते व लगेच दुसरा हट्ट सुरू होतो ) तसे, मला एखादी गोष्ट मिळायलाच इतका वेळ लागतो की तोपर्यंत त्यातील रसच निघून जातो व ते मिळते तेव्हा नकोसे झालेले असते. अर्थात, हा शेर काही फार ग्रेट नाही किंवा मी दिलेला अर्थ त्यातून नीट प्रकटही होत नसेल हे मला मान्य आहे. पण मला तसे म्हणायचे होते हे सांगण्यासाठी हा खुलासा!

मी स्वत:च्या रचनांवर इतके बोलत नाही, पण आपण दोघांनी प्रतिसाद दिलात व तोही एका तौलनिक द्रुष्ट्या सपाट शेराला दिलात म्हणून मुद्दाम दोन वेगळ्या शेरांचे अर्थ दिले ज्याने आपल्याला त्या शेरांतील द्रुष्टिकोन लक्षात आल्यास एकंदरच उपयुक्त ठरेल अशी गर्विष्ठ भावना होती.

प्रतिसादाबद्दल आपले व आपुलकीने दुरध्वनीवर संवाद साधण्याबद्दल वैभवचे मनापासून आभार!

willim.smith's picture

Cummins N14 Turbo ही

Cummins N14 Turbo
ही गझलच आहे!

- नचिकेत आठवले

mian meri's picture

This tavern style restaurant

This tavern style restaurant is ideal if you are looking for a place to join a group of friends or family for some good pizza and a beer You need to look into the type of establishment that you will be looking to go to in order to get the desired effect of the massageNo matter what type of camping you choose, tenting, RVing or cabin rentals, New Jersey has something for you You also need to look into the business practices of the establishment that you are going to visit to ensure that you will be receiving the attention and relief that you needBMW 528 Parts
This tavern style restaurant is ideal if you are looking for a place to join a group of friends or family for some good pizza and a beer You need to look into the type of establishment that you will be looking to go to in order to get the desired effect of the massageNo matter what type of camping you choose, tenting, RVing or cabin rentals, New Jersey has something for you You also need to look into the business practices of the establishment that you are going to visit to ensure that you will be receiving the attention and relief that you need

आनंदयात्री's picture

माझ्या

माझ्या मनात येते की मी तुला म्हणावे
"संबंध काय आहे माझा तुझा तसाही?"

प्रत्येक दु:ख माझे जेव्हा बनेल शाई
होतील शब्द सारे साधेसुधे, प्रवाही

’हातात येत नाही, वाटेत येत नाही”
माझी दिशा नसावी तुमच्या दिशांत दाही

खल्लास..... अप्रतिम...
थेट थेट भिडले...

धनंजय भावलेकर's picture

तडजोड

नाही कधीच झाले ते आज होत आहे
नक्कीच आजनंतर येणार श्वास नाही

अर्थ लागत नाही.. (5 वा शेर जोडण्यासाठी केलेली ही तडजोड तर नाही )

बेफिकीर's picture

संख्या

मी शेर मोजले भावलेकर! एकंदर 9 शेर दिसतायत. मधले चार शेर वाचायचे राहिले तर नाहीत? हा हा हा!

असो. आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. अर्थ लागत नाही यासाठी दिलगिरी!

एकंदर आयुष्यात माणसाला जे विविध त्रास / मनस्ताप वगैरे होतात त्या प्रत्येक वेळी काही ना काही उपाय / औषधे / वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्याने सगळेच त्रास आपल्या ताब्यात आहेत असा काहीतर गैरसमज झालेला असतो. पण शेवटचा जो त्रास होतो तेव्हा त्याच्यावर काहीही उपाय नाही हे जेव्हा लक्षात येते तेव्हा एक भयंकर दु:ख मनाला व्यापते. हा झाला शब्दार्थ!

शब्दार्थापलीकडील अर्थ ! काहीतरी विशिष्ट चांगले घडावे या प्रयत्नात माणूस असतो. जसे, वैभव लाभणे, प्रेम लाभणे वगैरे! याच प्रयत्नात असल्यामुळे त्याच्यात जगण्याची उर्मी टिकून असते. पण तेच झाले नाही किंवा होणार नाही हे लक्षात आल्यावर तो खचतो व ती उर्मी संपते. ( विशेषत कर्जबाजारी वगैरे लोकांच्या बाबतीत असे झालेले मीही पाहिले आहे. )

मुद्दा -

1. याच्यात हे सगळे कुठे म्हंटले गेले आहे असा जर प्रश्न असेल तर आपले म्हणणे खरे आहे. तसे स्पष्ट म्हंटले न जाण्यासाठीही मी दिलगीर आहे.

2. यात सच्चेपणा काय असा जर प्रश्न असेल तर त्याहीबाबत मी दिलगीर आहेच कारण मी परदु:खांच्या कल्पना करून 'गझला' रचतो हे यापुर्वीही सिद्ध झालेले आहे.

तेव्हा आपला रसभंग झाला यासाठी माफ करावेत.

धन्यवाद!

Leo123's picture

640-721 \ 642-611 \

640-721 \ 642-611 \ 642-631 \ 642-974 \ 352-001 \ 642-983 \ 650-296 \ 650-297 \ 642-262 \ 646-985 \
I am quite sure they will learn lots of new stuff here than anybody else!....There is also a lot of visual symbolism that is sometimes subtle, sometimes not so subtle.

clark41's picture

When I firstly saw your web,

When I firstly saw your web, I’ve been around in many pages that I’ll use to get my final assignment. I googling with my short idea in my brain, and then I met with useful article. I hope you can give several advices to me, because your knowledge is great, it can help many students to get great score in every task or project. If you don’t mind, I will contact you to make short discussion for my project. I write my short comment for you to give support for your site; my friends had used your article as reference in specific term and condition. After that, my friends are satisfied with your article (I’ve given reference to read many pages in your site). We can make other discussion later, because it will be worth to me. Thanks in advance, hope you contact me, so we can broaden our knowledge together.98-367 | MB2-631 | MB2-632 | MB2-633 | mb2-866 | mb2-867 | mb2-868 | MB3-859 | MB5-858 | mb6-818 | mb7-843