नियमावली

या संकेतस्थळावर साहित्य प्रकाशित करण्यासाठी खालील नियमांचा आणि मार्गदर्शक तत्वांचा आधार घ्यावा.

१. या संकेतस्थळावर फक्त मराठी भाषेतील साहित्यच प्रकाशित करता येईल.

२. इथे केवळ गज़ला आणि गज़लांसंबंधी लेखनच प्रकाशित करता येईल. इतर लेखन, साहित्य वा काव्यप्रकार या संकेतस्थळाच्या कक्षेबाहेर आहेत.

३. या संकेतस्थळावर विडंबने प्रकाशित केली जाणार नाहीत मात्र स्वतंत्र हज़ल प्रकाशित करता येतील.

४. संकेतस्थळाचा दर्जा राखण्याच्या दृष्टीने लेखनात बदल करण्याचा वा लेखन पूर्णपणे काढून टाकण्याचा अधिकार प्रशासक मंडळ राखून ठेवत आहे.

५. कोणत्याही प्रकारचे अश्लील, बिभत्स, जातीयवादी वा व्यक्तिगत चिखलफेक असलेले लेखन येथे प्रकाशित करू नये. असे लेखन काढून टाकले जाईलच शिवाय असे लेखन करणार्‍याचे सदस्यत्व रद्दही केले जाऊ शकेल.

६. येथे व्यक्त केल्या गेलेल्या सर्व मतांशी प्रशासक मंडळ सहमत असेलच असे नाही.