गझल आणि मीटर

इथल्या काही गझल वाचताना मला मीटर कळले नाही. (उदा :स्वप्न पहाटे पडुन जाते.) खरे तर गझल म्हणजे मीटरच असे समीकरण आहे मनात. आणि बर्याचदा मीटरमध्ये शब्द बसवाताना खुपच (नवीन गझलकाराची) तारान्बळ उडते.
इथे गझल लिहिताना मीटरची आवश्यकता नाही का?
राजसी
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
मीटर
राजसी,
सर्वप्रथम मराठी गज़ल परिवारात आपलं स्वागत करते.
गज़ल लिहीताना वृत्त पाळणं आवश्यक आहे हे तुमचं मत बरोबर आहे.
वृत्त दोन प्रकारची असतात. अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्त.
अक्षरगणवृत्तात लघू गुरूंचा (-हस्व आणि दीर्घ उच्चार होणारी अक्षरे) क्रम रचनेतल्या प्रत्येक ओळीत पाळावा लागतो, तर मात्रावृत्तात प्रत्येक ओळीतील मात्रांची संख्या सारखी असावी लागते.
तुम्ही उल्लेख केलेली गज़ल मात्रावृत्तात आहे.
पहिल्या दोन शेरांमधील मात्रा पाहू :
स्वप्न पहाटे पडून जाते
२+१+१+२+२+१+२+१+२+२ = १६
झोपच माझी उडून जाते
२+१+१+२+२+१+२+१+२+२ = १६
हाती असते काय आपल्या?
२+२+१+१+२+२+१+२+१+२ = १६
घडायचे ते घडून जाते
१+२+१+२+२+१+२+१+२+२ = १६
वृत्तात लिहीणे नवोदितांना कठीण वाटते हे खरे आहे. परंतु सरावाने ते सहज जमते.
आपल्याला समाधानकारक उत्तर देऊ शकले असेन अशी आशा आहे.
आणखी काही प्रश्न असतील तरी जरूर विचारा.
वृत्त
स्वाती, माहिती छान आहे. थोडी अजून भर घालतो.
कुठल्याही वृत्तात लिहिताना फक्त अक्षर किंवा मात्रांचे बंधन आणि त्याचबरोबर मिटरसाठी सगळ्यात महत्त्वाचा यती पाळणे अपरिहार्य असते. तो यती समान मात्रांवर येतो
उदा.
स्वप्न पहाटे पडून जाते
हे म्हणताना "स्वप्न पहाटे" नंतर आपण थांबतो. इथे मात्रा ८ आहेत
म्हणजे प्रत्येक ओळीत आठ मात्रांनंतर यती येणारच...
हाती असते......... आठ मात्रा
काय आपल्या?........... आठ मात्रा
अशा मात्रा वृत्ताला द्विपद्मावर्तनी म्हणतात. दोनदा आठ मात्रा आणि एकूण सोळा मात्रा!
पण त्याहुनही महत्त्वाचे... जर गझल मात्रा वृत्तात लिहायची असेल तर पहिल्या शेरापासून ही सोय घेतली पाहिजे. पण इथे पहिला शेर अस्खलीत अक्षरगणवृत्तात आहे.
स्वप्न पहाटे पडून जाते
२+१+१+२+२+१+२+१+२+२ = १६
झोपच माझी उडून जाते
२+१+१+२+२+१+२+१+२+२ = १६
इथे तुझा २ १ किंवा ल गा चा क्रम अगदी सारखा आहे. मग हे ही पुढे पाळले गेले पाहिजे असे वाटते.
Information छानच!!
सारंग ... पण मला हे अजुनही समजले नाही की-- कोणते वृत्त जास्त सोपे..की तसे काही नसते??
तसे काही नसते.. आणि असूही नये.
आभाळ,
चांगली गझल ही मुळात चांगली कविता असावी लागते. आणि कविता काय आपण वृत्त ठरवून लिहीतो का? बहुतांशी जो विचार (/ कल्पना / भावना) मांडायचा आहे, तोच आपली लय घेऊनच येतो असा माझा अनुभव आहे.
बाकी अक्षरगणवृत्तातील गझलेत दोन लघूंचा एक गुरू (क्रम बदलत नसेल तर) करता येतो या पुलस्तिंच्या मताशी मी सहमत आहे.
यतीबद्दल
सारंग,
यती पाळणे अपरिहार्य नाही. जवळपास साऱ्याच मोठ्या गझलकारांनी अनेक ठिकाणी यती पाळण्याची तसदी घेतली नाही आणि आशयाला महत्त्व दिले आहे. इक्बालपासून अनेकांची उदाहरणे हवी असल्यास देता येतील. मराठीतले उदाहरण द्यायचे झाल्यास 'पूर्तता माझ्या व्यथेची' ह्या भटांच्या कवितेतील 'तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी' ही ओळ बघा.
तारकांच्या मांडवाखा | ली चिता माझी जळावी
राधिका ताराप गागा | राधिका ताराप गागा
'मांडवाखाली' ह्या शब्दांत यती तुटतो आहे. नेहमीच्या एका विशिष्ट लयीत कविता वाचणाऱ्यांना यतिभंग लगेच खटकतो. पण माझा असा अनुभव आहे की कविता म्हणताना आपण कुठे, कसा जोर देता ह्यावरही अवलंबून आहे. यतिभंग जाणवू न देताही तुम्ही काव्यवाचन किंवा गायन करू शकता.
यती समान मात्रांवर येतोच असेही काही नाही.
ताराप, राधिका, गा | ताराप, राधिका
हे वृत्त घ्या. ह्या वृत्तात 'गा' नंतर यती घेतील. इथे कुठे समान मात्रा आहेत दोन्ही गटांत. असो.
शेवटी यतिभंग टाळता आला तर उत्तमच. पण यतिभंग म्हणजे ब्रह्मपातक नाही. त्याचा फारसा बाऊ करणे खुळेपणा आहे.
चित्तरंजन भट
धन्यवाद
स्वाती आणि सारंग , तुम्हा दोघांचे आभार. शंकानिरसन झाले.
अजून एक...
समजा गझल जर का 'अक्षरगण' वृत्तात असली तर गझलकाराला एखाद्या 'गा' स्वरासाठी 'लल' अशी replacement करायची मुभा असते का? मला वाटते नसावी... कारण स्वातीने म्हटल्याप्रमाणे
'ल' आणि 'गा' ह्यांचा क्रमही जर maintain करावा लागतो तर एखाद्या 'गा' स्वराला 'लल' करणे हा दोष असतो ना?
मार्गदर्शन करावे ...
गा चे ल ल
गा चे थेट "ल ल" केले तर चालते. परंतु क्रम महत्वाचा आहेच. उदा. "गा गा" चे "ल गा ल" केले तर दोष आहे.
-- पुलस्ति.
गा चे थेट "ल
गा चे थेट "ल ल" केले तर चालते. परंतु क्रम महत्वाचा आहेच. उदा. "गा गा" चे "ल गा ल" केले तर दोष आहे.642-481 CRMC
642-971 DCNID
642-627 IPS v7.0
642-631 AWLANFE
642-983 DCUCI
642-447 CIPT1
642-731 CUWSS
642-647 VPN
650-575 LCSAS
642-661 BGP
642-067 ARSFE
In recent past it was just
In recent past it was just ok to get a master degree in any of the running field and set your career we are much more into virtual studies and doing all those stuffs where we can explore and learn more.. a lot certifications introduced by Microsoft, Cisco and other international certifications in which you can study and get a good career too. I am so happy to be part of this revolutionary field and do suggest you too. because at the end "it always up to you to decide"...thanks!!
642-971 dumps
HP0-S28 dumps
JN0-343 dumps
70-291 dumps
642-974 dumps
642-631 dumps
1Y0-A16 dumps
1Y0-A21 dumps
Christmas Gifts is an
Christmas Gifts is an expression traced back as early as 1844 in the southern United States. It is derived from the tradition of saying "christmas gifts!" among typically poor African American and Anglo farming families in rural areas, when people would wake on Christmas morning and rush to say "Christmas Gift" before anyone else.
You have a very good site,
You have a very good site, well constructed and very interesting i have bookmarked you hopefully you keep posting new stuff.Fine information, thanks to the author. This work is really useful and significant.Resources like the one you mentioned here will be very useful to me! I will post a link to this page on my blog. I am sure my visitors will find that very useful.ccna|| MCP|| cissp exam|| cissp training|| MCSE|| mcitp|| pmp certification|| a+ certification||