गझल आणि प्रेमगीत

गझल आणि प्रेमगीत हे प्रकार एकच असतात ना? की त्यांच्यात काही फरक असतो? मी अशासाठी विचारतोय की मी सुरेश भटांच्या काही कविता वाचल्या. पण त्या प्रेमगीतासारख्या वाटत नव्हत्या. पण तरी त्या गझल म्हणून दिल्या होत्या.

- प्रणव सदाशिव काळे

प्रतिसाद

धन्यवाद

प्रणवजी
सर्वप्रथम ह्या संकेतस्थळाचे सदस्य झाल्याबद्दल आभार.

गझल आणि प्रेमगीत/गीत हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. प्रेमगीतामध्ये एकच विषय (प्रेम) घेऊन कडवी बांधलेली असतात. आणि ती मीटर मध्येच असतात परंतु गझल मध्ये प्रत्येक द्विपंक्ती वेगवेगळे विषय घेऊन लिहीता येते. प्रत्येक द्विपंक्ती एक स्वतंत्र कविता असते." सुरेश भटांच्या कविता प्रेमगीतासारख्या वाटत नव्हत्या पण तरी त्या गझल म्हणून दिल्या होत्या" यातच तुमचं उत्तर आहे.

आपल्याला ह्या संकेतस्थळावरील कुठली रचना आवडली तर प्रतिसाद देऊन प्रोत्साहन द्यावे ही विनंती .

धन्यवाद

आभार.

आभार. प्रत्येक द्विपंक्ती एक स्वतंत्र कविता असते हे उत्तर खूप आवडले. मी आता गझल ह्याद्ऋष्टीने वाचून बघेन.