शेर

माझ्या माहितीप्रमाणे गझलेमधल्या प्रत्येक शेराची पहिली आणि दुसरी ओळ ही पूर्ण असली पाहिजे आणि त्यामध्ये परस्परसंबंध असला पाहिजे. पण आजकाल मी पाहतो की छोट्या बहराच्या गझलांमध्ये एकच ओळ अर्धी अर्धी करून दोन ओळी म्हणून वापरल्या जातात.
उदा. जयंता 52 यांच्या गझलेतील हा शेर :
दे दुःख, आसवांची
नाही ददात काही
आता "दे दुःख, आसवांची" ही ओळ म्हणून पाहिली तर तीचा काहीच अर्थ लागत नाही.
हे चूकीचे आहे असे मला तरी वाटते.
जाणकारांनी मार्गदर्शन केले तर बरे होईल.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
- हे पान ईमेलने पाठवा
Neither do I know who is
Neither do I know who is Jayanta 52 nor have I read his Gazals. However, you seem to be right. The first line does not make sense. Sharad.
हे असे असेल कदाचीत
दिनेश केळुसकर
जयंता 52 यांना असे म्हणायचे तर नाही ना.?
दे दु:ख आसवांचे ('आसवांची " चूकून झालं असेल )
नाही ददात काही..
मला "ददात " हा शब्द खूप महत्वाचा वाटला.
चूक आहेच.
हा माझा शेर गझलशास्त्राच्या द्र्ष्टीने योग्य नाही.क्षमस्व.
चातक (जयन्ता52)