अंदाज

पावसाला नेमका अंदाज नाही
नाचणा-या पावलांना साज नाही

हा कसा द्यावा भरोसा चालताना
ओळखीची वाट धोकेबाज नाही

ऐकलेले बोलणा-या पोपटाला
आपला का आतला आवाज नाही

एकट्या वातीस वारा झोंबताना
जायबंदी सागराला गाज नाही

कोणताही रंग लावावा खुषीने
हे तसे आयुष्य का कोलाज नाही

प्रतिसाद

बहोत खूब...

छान आहे गझल

धन्यवाद ...

धन्यवाद ...