कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
हे रोजचेच गाणे
तरी आम्ही दिवाणे
ढकलु प्रश्न दुज्यावर
सांगु आम्ही उखाणे
हा आव जिंकण्याचा
जरी आम्ही उताणे
यश बैसले कुंपणी
शोधु आम्ही बहाणे
वाकडी वाट त्यांची
फक्त आम्ही शहाणे
आरंभ भैरवीने
असे आम्ही घराणे
चव कुरमुर्यांची खास
टाळु आम्ही बेदाणे
बहिष्कार घाली गाव
आम्ही माणुसघाणे