महाभारत

हिला गझल म्हणता येईल का ?? जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा.

अंगणात पारिजात, खुष त्यात सत्यभामा
सवतीच्या घरी सडा, अजुनी पडे रे श्यामा
हे भाग्य द्रौपदीचे, फिरुनी पणास लागे
कौरव पांडवाचा, झाला करारनामा
भवती किती शिखंडी, ठाकती उभे समोर
ठेवुनी शस्त्रे खाली, येतात भीष्म कामा
दुर्योधनाच्या करी, कर्णाचे बाहुले जे
नाचे हवे तसे ते, सलाम करुनी दामा
रिती, नीती, अनिती, सांगे कथाच कुंती
गांधारी ती अबोल, शोधी नव्या विरामा
सगळे पडे न दृष्टी, आज या संजयाच्या
धृतराष्ट्राच्या कुशीत, बसला शकुनीमामा
झिडकारीले त्वरीत, ते थेंब अमृताचे
मंजुर नव्हते जगणे, होऊन अश्वथामा
पोटावरीच लाथा, सोसुन क्षिणला पार
हाती धरुन पोहे, फासावरी सुदामा
अज्ञातवासी झाला, अनुजांसहीत धर्म
शतकांती शिशुपाला, आवर त्या घनश्यामा
सांगुन व्यास गेले, महाभारतात सत्य
हव्यास पुन्हा पुन्हा तो, बदलुन येई नामा

प्रतिसाद

no

This is not a ghazal.
Ghazal comprises with two things: radeef & kaafiyaa..र दी फ & काफिया
You have places kafiyaa ( rhymes ) beautifully but no radeef here....
Radeef is a repeated group of words . Ghazal ends with it. and my dear it-radeef contains kaafiya. ...purchase YALGAAR _SURESH BHAT.
It has revealed all info regarding ghazal writting.
....