कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
पाऊस कोसळे की हे आभाळच रडते आहे
हे असे कोणते ओझे धरणीवर गळते आहे
ती नको कळाया बाजू न्यायाची अन्यायाची
पण रक्त शोषूनी घेणे जळवांना कळते आहे
रानात एकदा मजला वाराही विचारुन गेला
गावात जात कोणाची वेशीवर जळते आहे
तोडून पाश मी सारे का बुध्द व्हायला गेलो
घरट्यात नाळ ती माझी खुंटीवर मळते आहे
ही पिढी जिचा मी वाली मरणाशी भिडते आहे
का असे सुरुंगी जगणे वातीवर विझते आहे