कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
पहिला प्रयत्न आहे. चुका सुधाराल ही अपेक्षा.
जगणे नव्हे आभास
मरणाचा रोज भास
सुख थांबेना मुठीत
करतो तरी प्रयास
धाय मोकले विवेक
इमान जेव्हा पणास
उठे पंगती सदैव
बळे बळे कुणा उपास
डोळ्यात रात जागी
गहीवरे छत उदास
उतु जाई तम घरात्
लखलख जगी आरास
लिही कुणी ना पानी
आखता वरी समास
जळलो चिती पुरेसा
संपला का प्रवास ?