कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
वाटते की दूर जावे फार आता
राहिली ना कोणती तक्रार आता
काल परवाचीच आहे बातमी की
माणसे होतील सारी ठार आता
ही कुणाची बेइमानी चल तपासू
घेतली आहे जरी मी हार आता
घाव आता घाल तू येणेप्रमाणे
बघ जुना झाला किती हा वार आता
बंद झाली ओळखीची सर्व दारे
लोक माझे राहिलेले चार आता.