प्रश्न

राजू वैशंपायन's picture

बाव-या माझ्या मना रे
यातना सरतात का रे?

दग्धतेला टाकुनी ते
राहती का रे निखारे?

पाहिलेली स्वप्न सारी
पापण्या सरतात का रे?

गंध विकण्याला स्वत:चा
कोष ते फुलतात का रे ?

राख होउन राहण्याला
यद्न्य ते जळतात का रे?

यातना नसतात तेव्हा
आसवे गळ्तात का रे?