कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
तळमनाची वात बघ लावून तू
एकदा जळ आतल्या आतून तू
मी कशी माझीच होऊ सावली
माझिया देहात अर्ध्याहून तू
जर तुला आली कधी माझी दया
तर दिलेला श्ब्द जा पाळून तू
चालताना गर्दीचे पाऊल हो
पण जुन्या वाटेस बघ थांबून तू
एव्हढा होता भरवसा तर कसा
जिवलगा गेलास रे सांडून तू