कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..

स्वप्नातल्या कळ्यांना फुलवायचे कशाला ?
जे वान्झ बीज त्याला रुजवायचे कशाला ?
मागुनिया कधी का कोणास प्रेम लाभे
मग दोन हात माझे पसरायचे कशाला ?
जे मान्य हो मतीला ह्रदया अमान्य सारे
ह्रदया अमान्य जे ते समजायचे कशाला ?
बाजार मांडलेला दुनियेत दु:खितांचा
माझेच दु:ख आता लपवायचे कशाला ?
मिळतात स्वस्त आता खोटे कितीक आसू
डोळ्यातल्या मण्यांना उधळायचे कशाला ?
मोजून घाव त्यांनी योजून घातलेले
सारेच घाव आता मिरवायचे कशाला ?
हळुवार भावनांना पुरले कधीच मागे
पुरले तयास आता उकरायचे कशाला ?
जाणे पदी इशाच्या हे भाग्य त्या फुलांचे
सरणावरी जळाया उमलायचे कशाला ?