कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
मी कधी प्रेमात पडले समजले नाही मला
मी कधी इतकी बिघडले ? समजले नाही मला
काय तू केलीस जादू ? मी जगाला विसरले
मी कधी मजलाच नडले ? समजले नाही मला
काय तू येऊन गेला या ठिकाणी एकदा ?
मी कशी येथेच अडले ? समजले नाही मला
घाव तू देऊन गेला... मी खुशाली सान्गते
मी किती नुसतीच रडले ? समजले नाही मला
तू कसा मागून आला ? अन पुढे गेला कसा ?
मी कशी मागेच पडले ? समजले नाही मला