कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
दोष तुम्ही द्या मला मी घेत नाही
धाडसी नसलो तरी मी भीत नाही
मी जरी नसलो असा भोळा बिचारा
पण कधी केला कुणाचा घात नाही
ते म्हणे विकलेच मी साहित्य माझे
सांग येथे काय विकले जात नाही ?
मागतो जखमेकरिता तेल माझ्या
वेदनाही साथ माझी देत नाही
रोज मी मरतो खुषीने सांजवेळी
आठवांना तोंड देता येत नाही
कोण म्हणतो गीत मी गातो सुरीले ?
दर्द माझा बोलतो मी गात नाही !
प्रतिसाद
अप्रतीम गजल
मला शेवटचा शेर खूप आवडला
झकास !!!!!!!!!!!!!!
झकास !!!!!!!!!!!!!!