भावना शब्दान्च्या..

शब्दाना भावना असतात, त्याना नावे ठेऊ नका
"तुझी शपथ" म्हणताना, मानेला चिमटा देऊ नका

"मानवन्दना" देताना शरमेने मान खाली घालू नका
"बाप्पा मोरया रे" म्हणताना वरच्या बाप्पाला मोर बनवू नका

आश्वासाने देताना भलीभली, दुसर्याचा श्वास काढून घेऊ नका
"वहिनी" सम्बोधताना सर्वाना , मानभावाला फुले वाहू नका

"निअर आणि डिअर" म्हणून हरणासारखे लाम्ब पळू नका
वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, उज्वल भविष्याला विझवू नका

शवाला मूठमाती देताना
त्याचे जीवन मातीमोल करू नका...