माझा आरसा

माझा आरसा मला खूप आवडतो
सकाळी उठल्यावर सुहास्य स्वागत करतो
आशेची पालवी जागवत.....

मध्येच केव्हाही डोकावले तर आणि
काही वेडेवाकडे असले तर सरळ करतो
प्रगतीची वाट दाखवत....

सन्ध्याकाळी तो मला समाधानचे हसू दाखवतो
आणि मी निष्चिन्त झोपते
नव्या युगाची वाट पाहत....

माझा आरसा मला खूप आवडतो
मी प्रार्थना करते की तो केव्हाच मलिन होऊ नये
कारण तो मलिन झाला तर त्याचे हास्य लोपेल
आणि पर्यायने माझेही ....

प्रतिसाद

नचिकेत's picture

गझल...

अलका,
हे संकेत स्थळ गझल साठी समर्पीत आहे. इथे फक्त गझल व गझल विषयी लेखन / चर्चा अपेक्षित आहेत. तुम्ही तुमचे काव्य इतर संकेतस्थळांवर (http://www.maayboli.com/gulmohar etc) नक्की प्रकाशित करा.

चू.भू.दे.घे.
- नचिकेत आठवले

गझल

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. माझे मत-

१. गझलेचे सन्दर्भ बदलत चालले आहेत. जी भावना मनाला भिडली, रुतून बसली आणि उफळून आली, ती माझी गझल!
२. मी गझलकार नक्की च नाही; पण सुरेश भटान्च्या गझलान्ची चाहती मात्र जरूर आहे, म्हणूनच हे सन्केत्स्थळ जन्मताच मी सदस्य झाले होते आणी ज्या काही माझ्या जुन्या रचना सन्ग्रही आहेत त्या इथे रसिकान्च्या पर्यन्त पोहचवत आहे.
३. मला वेळेअभावी माझ्या रचना सादर करायला कठीण जात असल्याने जे काही एक उत्तम दर्जाचे सन्केतस्थळ मिळाले आहे त्याचा वापर करत आहे.
४. माझी " वेदना" ही रचना मागील वर्षी भटान्च्या गझलान्वर आधारित एक कार्यक्रम पाहून आल्यावर लगेचच रात्रि ११.३० वाजता जन्माला आली आहे.

तरीही मी अन्य ठिकाणी सादरीकरणाचा प्रयत्न करीन. धन्यवाद. चू.भू.द्या.घ्यावी.

अलका.