डोळे भरून आले

डोळे भरून आले, म्हणून बरेच झाले
पुलाखालून बरेच पाणी गेल्याचे कळले

डोळे भरून आले, म्हणून बरेच झाले
नजरेतले सल एकदम सारे वाहून गेले

डोळे भरून आले, म्हणून बरेच झाले
शुष्क गाल जरा धुतले तरी गेले

डोळे भरून आले, म्हणून बरेच झाले
दु:खाचा इथे दुष्काळ नाही, हे तरी कळले

डोळे भरून आले, म्हणून बरेच झाले
आजचे जेवण तरी, अळणी नाही लागले

डोळे भरून आले, म्हणून बरेच झाले........