कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
नव्याने गझल शिकणार्यांसाठी यासंदर्भात नेहेमी वापरल्या जाणार्या शब्दांचे अर्थ या तक्त्यात द्यायचा प्रयत्न केला आहे.
उदाहरणासाठी
ऋतू येत होते, ऋतू जात होते
फुलावे कसे हे कुणा ज्ञात होते
हा मतला घेऊ.
| शब्द | अर्थ | उदाहरण |
| शेर | स्वतंत्रपणे जिचा अर्थ लागतो अशी वृत्तादि नियम पाळून लिहीलेली द्विपदी. | वर उधृत केलेली द्विपदी. |
| मतला | गज़लचा पहिला शेर. हा महत्वाचा असतो कारण या शेर मुळे गज़लची ज़मीन ठरते. | वर उधृत केलेली द्विपदी. |
| ज़मीन | बेहेर,रदीफ़,काफ़िया आणि अलामत यांनी बनलेली चौकट. ही चौकट मग कुठल्याही शेराला ओलांडता येत नाही. | |
| बेहेर | वृत्त. | येथे भुजंगप्रयात, अर्थात लगागा * ४. |
| मिसरा | एक ओळ. | ऋतू येत होते, ऋतू जात होते |
| उला मिसरा | शेरातली पहिली ओळ. | ऋतू येत होते, ऋतू जात होते |
| सानी मिसरा | शेरातली दुसरी ओळ. | फुलावे कसे हे कुणा ज्ञात होते |
| रदीफ़(अंत्ययमक) | मतल्यात दोन्ही मिसर्यांच्या शेवटी आणि त्यानंतरच्या प्रत्येक शेराच्या सानी मिसर्याच्या शेवटी येणारा common शब्दसमूह. | होते |
| काफ़िया(यमक) | रदीफ़च्या आधीचा असा शब्द, ज्यातली शेवटची एक वा अधिक अक्षरं common असतात. | जात,ज्ञात |
| अलामत | काफ़ियामधल्या common अक्षरसमूहाच्या आधी येणारा common स्वर. हा स्वर common असतो, व्यंजन बदलते. | ' आ'. जात आणि ज्ञात मधे ' त' हे common अक्षर, त्याआधीच्या अक्षरांमधला ( जा,ज्ञा - व्यंजनं ज् आणि ज्ञ्) common स्वर. |
| मक्ता | शेवटचा शेर. पूर्वी ज्या काळात पुस्तकं छापली जात नव्हती, तेव्हा गज़ल कोणी लिहीली हे कळण्यासाठी या शेरात लिहीणार्याचं नाव वा टोपणनाव ( तखल्लुस) गुंफायची पद्धत होती. आता तशी गरज राहिलेली नाही. | लढे जो तमाशी, लढे प्राक्तनाशी.. ' मिनू', जीत त्याचीच समरात होते |
प्रतिसाद
सोप्या आणि नेमक्या शब्दांत
स्वाती,
अतिशय सोप्या आणि नेमक्या शब्दांत तुम्ही नियम लिहिले आहेत.
मन:पूर्वक धन्यवाद!
- कुमार
धन्यवाद
खूप मदत झाली . असेच आमचे अद्न्यान दूर करत रहा...