स्वप्न पहाटे पडून जाते...

अजब's picture

स्वप्न पहाटे पडून जाते
झोपच माझी उडून जाते...

हाती असते काय आपल्या?
घडायचे ते घडून जाते...

ओठ बोलती बरेच काही
सत्य आत का दडून जाते?..

तुझा चेहरा किती बोलका!
मनातले उलगडून जाते...

'अजब' असे हे तुझे वागणे
कसे मला आवडून जाते?..

चक्रपाणि's picture

सहज

गझल सहज, सरळ आहे.

ओठ बोलती बरेच काही
सत्य आत का दडून जाते?..

हे विशेष आवडले.

Wakde Dayanand Shankarraor's picture

I Like this Gazal

Wakde D. S.
System Administrator
Pune

आनंदयात्री's picture

'अजब' असे हे

'अजब' असे हे तुझे वागणे
कसे मला आवडून जाते?..

मला सर्वात आवडलेला शेर..

पण संपूर्ण गझलच सुंदर आहे..

चित्तरंजन भट's picture

सहजसुंदर

अश्विनराव,

सहजसुंदर गझल. मतला विशेष. आणि मनातले उलगडून जाणे फारच आवडले. मनातले उलगडून जाते... वाचताना मजा येते आहे.

चित्तरंजन

जयश्री अंबासकर's picture

क्या बात है!

अजब.....खूप सहज उतरलीये. फ़ारच गोड !
मक्ता तर एकदम झकास.....!

माणिक जोशी's picture

सहि....!

मस्तच उतरलिये गजल... खुप सुन्दर !

ओठ बोलती बरेच काही
सत्य आत का दडून जाते?..

छान पकडलय शब्दात !

jyotip68's picture

swapna

it is excellent, i dont have devnagari and cant type it so this compliment in english........lets go for it

परीवश's picture

वा!

सहज, सोपी आणि गेय गझल. आवडली.

कुमार's picture

वा!

अजबराव,
सगळेच शेर सुंदर आहेत, थोडक्यात बरंच सांगणारे.

'अजब' असे हे तुझे वागणे
कसे मला आवडून जाते?.. वा!
- कुमार

केशवसुमार's picture

वा

अजबराव,
सुंदर गझल.... कुमार यांच्याशी सहमत ...

ओठ बोलती बरेच काही
सत्य आत का दडून जाते?.. क्या बात है..

तुझा चेहरा किती बोलका!
मनातले उलगडून जाते... हे दोन शेर विशेष आवडले..

नेहमी प्रमाणे आमचा एक खोडकर प्रतिसाद इथे वाचा

केशवसुमार