त्रास

चक्रपाणि's picture

गर्दीत आठवांच्या झाले उदास जीणे,
विसरू कसा तुला मी? थांबेल श्वास घेणे.

मेघांतल्या सरींचा ग्रीष्मात भास होणे,
डोळ्यांतल्या ढगांनी मग पावसास गाणे.

सोसायचे किती मी हे लाड सागराचे?*
(घेऊन चिंब लाटा भेटावयास येणे)

झाला सराव आता दुःखात रंगण्याचा,
बेरंग या सुखांची चित्रे भकास होणे.

शिकलोय मीच माझी भाषा मुक्या फुलांची,
उमलून एकदाचे कोमेजण्यास जाणे.

तू एकदा नव्याने ये ना मिठीत माझ्या*
मी लांबवीन माझे मजलाच त्रास देणे.

* मिसर्‍यांबाबत सुचवण्यांसाठी चित्तरंजन भट यांचे विशेष आभार

मेघधारा's picture

सुरेख

खुपच सुंदर
तू एकदाच.. व्वा क्या बात है!

मेघा

आनंदयात्री's picture

सोसायचे

सोसायचे किती मी हे लाड सागराचे?
(घेऊन चिंब लाटा भेटावयास येणे)

वा..........
कंसातला सानी मिसरा खूssssप आवडला...

चित्तरंजन भट's picture

वा!

चक्रपाणी, छानच गझल आहे. 'श्वासघेणा' मिसरा फार आवडला. दुसऱ्या शेरातला कल्पनाविलासही. लाटा उत्तम. मक्ताही उत्तम.

मी तुला सुचवण्या दिलेल्या काही आठवत नाही. दिल्या असल्या तरी जाहीर आभार वाचले की ओशाळल्यासारखे होते बाबा. असो.
नचिकेत's picture

सुंदर!!!

छान themes!!!

मला ह्या गजल मधल्या तांत्रिक बाबी (विशेषतः रदिफ आणि अलामत) मात्र लक्षात येत नाहीयेत. त्याबद्दल काही सांगाल का?

चक्रपाणि's picture

रदीफ नाही आणि काफियांचे दोन संच आहेत

या गझलेत रदीफ नाही. रदीफ नसलेल्या गझलेला 'गैर-मुरद्दिफ' गझल म्हणतात. तसेच या गझलेत काफियांचे दोन संच आहेत. पहिला {घेणे, जीणे, होणे, जाणे इ.} आणि दुसरा {श्वास, पावसास, उदास, भकास, त्रास, भेटावयास, कोमेजण्यास इ.}. असे काफियांचे दोन संच असलेल्या गझलेला 'जुल्काफिया' गझल म्हणतात. तसेच येथे काफियांच्या पहिल्या संचासाठी अलामतीची सूट मतल्यातच घेतल्याचे दिसून येईल. दुसर्‍या संचासाठी मात्र अशी सूट घेतलेली नाही; तेथे 'आ' ही अलामत आहे.

नचिकेत's picture

धन्यवाद!!!

वा!!! नवीन शिकायला मिळाले. 'जुल्काफिया' गझल बद्दल माहीत नव्ह्ते. प्रथमदर्शनीच गजमल गैरमुरद्दहफ आहे हे लक्षात आले होते, पण काफियाच्या पहिल्या संचामुळे confusion झाले होते.

पुलस्ति's picture

धन्यवाद !

चक्रपाणि, या माहितीबद्दल धन्यवाद! नचिकेतप्रमाणेच मलाही गैर-मुरद्दिफ ठाऊक होते. पण "जुल्काफिया" प्रथमच समजला आणि वाचायलाही मिळाला.
-- पुलस्ति.

केशवसुमार's picture

वा

चक्रपाणि,
सुरेख गझल, १,३,४ हे शेर विशेष आवडले.
तुमच्या मालाची नेहमी प्रमाणे पोचपावती इथे दिली आहे

केशवसुमार