कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
मध्यंतरी एक चर्चा 'मराठी गझलेतील संकेतां'वर सुरू झाल्याचं (आणि समाधानकारक उत्तर न मिळताच संपल्याचं) स्मरतं.
कार्यशाळेतील प्रवेशिका वाचत असताना लक्षात आलेलं हे एक गमतीशीर 'स्टॅटिस्टिक्स' तुमच्यासमोर मांडत आहे.
पुढील तक्त्यात आहेत कार्यशाळेत वारंवार वापरले गेलेले काही संकेत आणि एकूण ३५ प्रवेशिकांमधील ते संकेत वापरणार्या शेरांची संख्या. :)
अर्थात, रूढ संकेत वापरले अथवा नाही यावरून शेराचा दर्जा ठरत नाही (आणि एकूणच सांख्यिकीने कधीच काहीच सिद्ध होत नसतं :) ) हे आधीच नमूद करायला हवं.
| मेघ,पाऊस,बरसणे इ. | १५ |
| मृत्यूशी संबंधित | १२ |
| चंद्र,चांदणे,तारांगण इ. | ११ |
| मोगरा,गजरा,गंध,दरवळ इ. | ५ |
| मद्यपानाशी संबंधित | ५ |
| टाळाटाळ | ५ |
| आरसा,प्रतिबिंब,चेहरे,मुखवटे | ५ |
| स्वप्न | ४ |
| घाव ( ' आपल्यांनी' दिलेले) | ४ |
| गाव,वेस इ. | ३ |
| भास | २ |
प्रतिसाद
ह्म्म..
interesting!
वा!! हे भलतंच...
भारीच Survey आहे!मजेशीर.
वा! खूपच चांगला अभ्यास...
इतक्या बारकाईने गझल कार्यशाळेतील गझलांचे रसग्रहण करून (गझलकार) कवियत्री स्वाती यांनी फारच मोलाची कामगिरी केली आहे.
या सांख्यिकीनं जे काही सिद्ध होतं त्याची शहानिशा न करताही इतकं नक्की दिसतंय की जाणते अजाणतेपणी मराठी गझलेत कांही संकेत रुजू घातलेत. ही चर्चा आता अधिक डोळस व्हावयाला हरकत नाही.
स्वाती यांचे आभार.
Interesting!
-स्वाती,
अशा विश्लेषणाचं कौतुक वाटलं. (कौतुक म्हटल्यास चालेल ना?)
-सतीश
चालेल की! :)
सतीश,
कौतुक नक्की चालेल. :)
Jokes apart, इथल्या सगळ्याच मित्रमैत्रिणींना कौतुक करायचा आणि कान उपटायचाही - अधिकार आहेच. आणि तुम्ही तर मोठे आहात माझ्यापेक्षा. :)
मस्तच!!
स्वाती, तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे गं.......!!
हम्म्
उत्तम माहिती.. ह्या संकेतान साठी विडंबनात काय वापरायच ह्याचा आता तकता तयार करता येईल..कसे.. ;)
कर्यशाळा उत्तम राबल्या बाद्द्ल सर्व संयोजकांचे अभिनंदन आणि पुढिल कर्यक्रमांना शुभेच्छा.
(खरतर आभार पण मानयला पाहिजेत.. आमचा कच्यामालाचा प्रश्न तातपूरता तरी सुटला, नाहीतर मधे फार वाईट दिवस गेले हो)
वाईट दिवस..
"मधले दिवस फार वाईट गेले" -- हा! हा!!