कार्यशाळा निकाल :)

आणि आता सहर्ष जाहीर करत आहोत कार्यशाळेतील विजेते:

तृतीय पारितोषिकाची मानकरी ठरलेली गझल आहे....

सोनाली जोशी यांची!

द्वितीय पारितोषिकाचे एक नव्हे, तर दोन मानकरी आहेत...

नचिकेत आठवले आणि कुमार

'शेरखान' स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेली गझल आहे स्वाती यांची.
आणि या गझलला सर्वाधिक गुण देणारे पारखी शेरखान आहेत : सुधीर जोशी !

आणि मराठीगझल.कॉमवरील कार्यशाळेत प्रथम पारितोषिक मिळवलेल्या गझलकाराचं नाव आणि मुलाखत
http://www.marathigazal.com/node/309
इथे वाचा!!! :)

सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन!! :)
विजेत्या गझलकारांनी कृपया आपले पत्ते कळवावेत, म्हणजे पारितोषिके त्यांना पोहोचवण्याची व्यवस्था करता येईल.

प्रतिसाद

अभिनंदन..

अभिनंदन सोनाली...
'कोणती ही रीत झाली वागण्याची?
भेटण्याची वेळ तो पाळून गेला'

अजुनही लक्षात आहे... :)
-आभाळ :)

नचिकेत's picture

अभिनंदन!!!

पुलस्ति, मन:पुर्वक अभिनंदन!!!!
कुमार, सोनाली, तुमचेही अभिनंदन!!!

तुमच्याकडून अश्याच चांगल्या गझल वाचायला मिळत राहतील ही खात्री आहे.

स्वाती आणि सुधीर, तुमचे ही अभिनंदन.

पु.ले.शु.
- नचिकेत आठवले

वा!

सर्वांचेच मनपूर्वक अभिनंदन...
पुलस्ति..जियो!!!
मुलाखत मस्त आणि रोखठोक आहे!!
पुलेशु.
-आपले आभाळ :)

अभिनंदन!!!

-पुलस्ति, नचिकेत, कुमार, सोनाली,

सर्वांचं मन:पूर्वक अभिनंदन!!!

नचिकेत - पुन्हा एकदा करून दाखवलंत. लगे रहो!!!

कुमार - तुमच्या गझलचा मतला मला नं. १ वाटला होता, अजूनही वाटतो.

आणि स्वातीचंही अभिनंदन! "पीळ आहेच ना लिखाणात". :)

-सतीश

ता.क. : मा. संयोजक आता श्री सारंग यांची मूळ गझल देतीलच... :)

अभिनंदन

पुलस्ति, नचिकेत, कुमार, सोनाली,
अगदी मनापासून अभिनंदन आणि पुढच्या लिखाणा साठी शुभेच्छाही.

सोनाली, शुभेच्छा,
नचिकेत, परत एकदा : सहीच
कुमार, सतीशना अनुमोदन, मतला छानच आहे
स्वातीची गझल छानच आहे यात काहीच शंका नाही. अभिनंदन

सुधीर

अभिनंदन!!!

कार्यशाळेत पारितोषिके मिळवणार्‍या पुलस्ति, कुमार, नचिकेत आठवले आणि सोनाली जोशी यांचे हार्दिक अभिनंदन!
आपणा सर्वांकडून असेच उत्कृष्ट गझल लेखन होत राहो अशी मन:पूर्वक शुभेच्छा!

शेरखान स्पर्धेतील विजेती गझल लिहिणार्‍या स्वाती यांचेही अभिनंदन!
आणि शेरखान सुधीर जोशींचेही अभिनंदन.

इतर सर्व सहभागी गझलकारांचेही सुंदर गझला लिहील्याबद्दल अभिनंदन!

झाड's picture

सोनाली,

सोनाली, नचिकेत,कुमार, आणि पुलस्ति हार्दिक अभिनंदन!!!

गिरिराज's picture

अभिनंदन!!

पुलस्ति,नचिकेत,सोनली जोशी,कुमार आणि स्वाति यांचे हार्दीक अभिनंदन!

नचिकेत,पुन्हा एकदा ! असेच लिहित रहा!

कुमार's picture

धन्यवाद आणि अभिनंदन

अतिशय नेटकं आणि शिस्तबद्ध आयोजन केलेल्या या कार्यशाळेबद्दल संयोजकांना मन:पूर्वक धन्यवाद!
पुलस्ति, नचिकेत आणि सोनाली - अभिनंदन!! स्वाती, सुधीर - तुमचंही अभिनंदन!!!

- कुमार

उपक्रमाची सर्वसमावेशकता

वा वा. पुलस्ति, नचिकेत, कुमार, सोनाली, स्वाती आणि सुधीर, सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

विजेत्यांमध्ये नवे आणि जुने, स्त्री आणि पुरुष, देशस्थ आणि परदेशस्थ अशा सर्व प्रकारचे गझलकार आहेत ही गोष्ट ह्या उपक्रमाची सर्वसमावेशकता दाखवते. ह्या गोष्टीचा विशेष आनंद झाला.

कुमार's picture

वा!

देशस्थ आणि परदेशस्थ .... आवडले!
- कुमार

धन्यवाद आणि अभिनंदन

या उपक्रमाच्या संयोजनाबद्दल संयोजकांचे अभिनंदन. कुमार,नचिकेत आणि सोनाली - तुमचेही अभिनंदन! सहभाग घेतलेल्या सर्वांचे मनापासून आभार!
-- पुलस्ति.

अभिनंदन

पुलस्ति,नचिकेत,सोनली जोशी,कुमार आणि स्वाति यांचे मन:पूर्वक अभिनंदन! :-)

पुढल्या गझल् कार्यशाळेची वाट बघत्ये.
संयोजकांचेही अभिनंदन,
आणि हो यात नंबर आलेल्या गझलकारांची मुलाखत,शेरखान अश्या नवीन कल्पना आवडल्या फारच.

पहिल्यांदाच गझल लिहीणं हा अनुभव प्रचंड रोमांचकारी असतो (काय लोक्स बरोबर ना?)आपलेच विचार आपल्याकडुनच सुंदर शब्दात येतात हे पाहुन गम्मत वाटते.(व्रुत्ताची किमया......)