'शेरखान' स्पर्धा : ८ (अंतिम फेरी)

१.
दर्शनासाठी कुणी दिंडीत आला
तो स्वतःही पालखी उचलून गेला...

२.
हा असा भर भर मला वाचून गेला
तो तसा वर वर मला चाळून गेला

३.
राख मिश्किल हासुनी सांगेल माझी
'सुंभ जळला - पीळ पण राहून गेला!!'

प्रतिसाद

क्या बात है!!

या फेरीतले सर्व शेर दर्जेदार वाटले!
१ - ९.० : अप्रतिम!! इतका सहज, अर्थपूर्ण आणि अस्सल मराठमोळा शेर आहे की प्रतिक्रियेसाठी शब्द सुचत नाहियेत!!
२ - ७.५ : छान! 'वाचणे/चाळणे' , 'भरभर/वरवर' हे विरोधाभास मस्त उतरले आहेत!
३ - ९.० : वाहवा! 'मिश्किल' शब्द आणि 'सुंभ जळणे/पीळ राहणे' ही अतिशय लोकप्रिय म्हण सुरेख गुंफलीय!!
- पुलस्ति

क्या बात ...!

१. -> ८.५, सहजता अप्रतिम !

२. -> ७.५, पुलस्तिला अनुमओदन... विरोधाभास सुन्दर !

३. -> ९.५, अप्रतिम शेर, मिश्किल शब्दाचा वापर नितान्त सुन्दर !! मक्ता म्हणून असेल हा शेर तर त्या गजलेच सौदर्य क्या कहेने !!

सुंभ जळला - पीळ पण राहून गेला

वाचून आणि चाळून आवडले. सुंभ आणि पीळ म्हणीचा वापर आवडला.

दर्जेदार फेरी...बर्‍याच प्रतिक्षेनंतर : ) :)

१)८/१० वा! अप्रतिम. शेरामध्ये आध्यात्मिक ससपेन्स दडल्याचा भास होतोय. 'कुणी' , 'तो' ह्या शब्दांच्या वापरामुळे शेराला Spiritual छटा लाभलेली आहे असे मला वाटतेय.

२)९.४/१० Ultimate!!! शेरखान च्या सर्व फेरीमध्ये हा शेर मला सगळ्यात जास्त आवडला. कुणीच माझी नीटशी दखल घेतली नाही हे किती समर्पक आणि सहज शब्दात मांडले आहे!!!जियो...जियो..सुभानअल्ला!!!!

३)९/१० हा अजुन एक वाचल्या क्षणीच काळजात घुसणारा आणि लक्षात राहणारा अप्रतिम शेर. जगण्याची जिद्द जबरदस्त आहे!!!'सुंभ जळला-पीळ पण राहून गेला' ह्या मिसर्‍यात म्हणीचा वापर करण्याचे धाडस सार्थ झाले आहे!! अश्या प्रकारचे शेर फार कमी वाचायला मिळतात.
शिवाय 'राखेचे मिश्किल हासणे' जबरदस्त कल्पना!!!सलाम डेरींगबाज शेर!!!
-----------------------------------------------------------
असो.ही शेरखानची शेवटची फेरी.ह्या स्पर्धेतून बरेच काही शिकायला मिळाले.'रसग्रहण' म्हणजे नेमके काय हे तर समजलेच ,पण त्यासोबतच मानवीय भाव-भावनांच्या विविध छटांचे संम्मेलन चिकीत्सक आणि जिज्ञासू प्रवृत्तीने पाहण्याची ओढ निर्माण झाली. येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक शेराला नुसते 'वा!अप्रतिम,ठिक,ह्म्म्म' असा अभिप्राय देण्यापेक्षा ,अभिप्राय देण्यापूर्वी प्रत्येक मिसर्‍याकडे प्रामाणिक जाणीवेने पाहण्याची मराठी गझलेला नितांत आवश्यकता आहे हे सुद्धा जाणवले. स्वत:च्या अनुभूतीशी वेगवेगळे चांगले-वाईट शेर पडताळून पाहण्याची ही मैफल निश्चितच सर्व नवोदीत/जाणकार गझलकारांना बरेच काही शिकवून गेली/जाईल.शेरखान स्पर्धेची Creative Concept शोधणार्‍या आणि ती यशस्वीपणे राबविणार्‍या सर्व गझलकारांचे आभार आणि अभिनंदन.
--आपले आभाळ :)

व्वा!

१. ७/१०
२. ८/१०
३. व्वा! ९/१०

ये हुईना बात!

१.-८/१०. वा! जोमदार शेर.
२.-९.५/१०. सोपे शब्द आणि अनेकपदरी अर्थ. आदर्श शेर.
३.-८.७५/१०- अस्सल मराठी शेर. आणि जबरदस्त पोच!

शेपटातला तडाखा का काय म्हणतात तो बसला!

नचिकेत's picture

वाहवा!!! मजा आ गया....

१. ८.५/१०
२. ९.५/१०
३. ९/१०

- नचिकेत आठवले

मस्त

१: ७
२: ७
३: ९

आनंदयात्री's picture

विसुनानां

विसुनानांशी पुरता सहमत..
१. ७/१०
२. ९/१० - अप्रतिम.. एकदम सह्ज.. खूप आवडला..
३. ८.५/१० - राखेचं मिष्किल हासणं जास्त आवडलं...

वा!

१) ८/१०
२) ८/१०
३) ९.५/१०- क्या बात है! हा मक्ता असेल तर पूर्ण गजल काय ताकदीची असेल! 'मिश्किल', म्हणीचा वापर अगदी चपखल. सर्वात आवडलेला शेर!

दादा

१. ४ (मला काही संदर्भ लागला नाही - but that could be me. या शेराचा अर्थं/संदर्भ कुणी सांगेल का?)
२. ८.५ सहजपणा, आशय, शब्दांची मांडणी- मजा आया!
३. ९.५ (१० द्यावेत की नाही या विचारात आहे. सगळ्यात आवडलेला शेर. काय नाहीये या शेरात - रोजचं बोलल्यासारखं, वेचक शब्द... आरपार जाणारा शेर)

रसिक's picture

मस्त्

१. ५/१० अर्थ लावता आला तरी स्पष्ट नाही
२. ९/१०
३. १०/१०
दुसरा आणि तिसरा शेर जबरदस्त!
नि:शब्द ह्या गुणांनी त्यांचे मूल्यमापन शक्य नाही!