'शेरखान' स्पर्धा : ७

१.
एक साधा प्रश्न त्याने मांडला अन्
वीण जीवाची पुरी उसवून गेला...

२.
रोजचा मारेकरी आला असावा
रोजच्यागत जीवही हुरळून गेला

३.
ज्या क्षणी मज जीवनाचे ध्येय कळले
ते म्हणाले, 'पार कामातून गेला!'

प्रतिसाद

चांगले..

१ - ६.० - चांगला आहे पण 'साधा प्रश्न' आणि 'जीवाची वीण' काही कनेक्ट होत नाही. शिवाय, इथे वापरलेला 'जीव' हा 'जीवाची' हवा की 'जिवाची' हवा.. जरा शंका वाटतेय.
२ - ६.५ छान! पण.. 'मारेकरी येणं' आणि 'जीव हुरळून जाणं' - अपेक्षित परिणाम येत नाही.
३ - ७.० हा शेर आवडला! उला मिसरा अजून सहज करता येईल का? जरा पुस्तकी वाटतोय... चू.भू.द्या.घ्या.
-- पुलस्ति

ठिक आहेत शेर !

१. ->५

२. ->६.५

३. ->५

बर्‍यापैकी चांगले आहेत..

१)४.५/१० नाही आवडला. अर्थ कळाला पण शेरात 'दम' नाही. फारच साधा.

२)६.८/१० मस्त आहे. मारेकर्‍याने जीव हुरळून जातो असले मारेकरी पहिल्यांदाच वाचले. मिसर्‍यामधला संबंध इतकासा स्पष्ट नाही.

३)७.५/१० छान.उला मिसरा अजून सुधारता आला असता. सानी मिसरा मस्त!! 'कोसला' आठवली.

-आपले आभाळ :)

नचिकेत's picture

...

१. ६.५/१०
२. ७.५/१०
३. ८/१०

- नचिकेत आठवले

मस्त

१: ८.५

२: ७

३: ९

१) ६- ठीक २)

१) ६- ठीक
२) ७- ह्म्म :) 'जीवही' ऐवजी मी 'जीव हा' वाचले.
३) ९- व्वा!

दाद

१.६ (शेर आवडला पण जीवाची की जिवाची? मीच गोंधळलेय)
२. ७ यातला रोजच्यागत हा शब्द आवडला - रोजचा शब्द वाटतो)
३. ६ कल्पना मस्त आहे.

१.६/१० २.७/१०

१.६/१०
२.७/१० पण असावा का?
३.७/१० व्वा!

चांगले आहेत.

१.-६/१०. - वीण जीवाची जरा खटकली.
२.-६/१०- रोजरोज त्याच मारेकर्‍याकडून मरण्यात हुरळून जाण्यासारखे काय आहे ते कळले नाही.
३.-७.५/१०-कल्पना आवडली. 'जीवनाचे ध्येय' सखाराम गटणे वाटले.

रसिक's picture

विसुनानांशी सहमत्

१. ७
२. ६/१०
३. ८/ १०
स्पष्टीकरण विसुनानांसारखेच्

सोनाली जोशी's picture

छान्

हे सर्व उपहासात्मक शेर आहेत.
१. ७/१०-कल्पना पूर्ण, दोन्ही ओळी निगडित पण कल्पनेचे नाविन्य, मांडणी यात् खूप काही वेगळे नाही.

२. ७/१० ठीक.

३. ८/१० ध्येयवेड्या माणसावर उत्तम टिप्पणी, कल्पना, मांडणी सरस वाटली.