कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
१.
मी उधाणाचाच होतो चंद्र तेंव्हा
ना कळे दर्याच का आटून गेला...
२.
अस्त केव्हा व्हायचे हे शब्द माझे
काजव्यांचा जन्म कंटाळून गेला
३.
एवढी पडझड इथे झाली कशाने?
एक केवळ शब्द तो मोडून गेला
प्रतिसाद
मस्त आहे शेर !!
१. -> ७/१०, कल्पना, मान्डणी अप्रतिम !
२. -> ५, अस्पष्ट वाटला हा शेर मला !
३. -> ७/१०, सहजता, लय अन आशय मस्तय !
एवढी पडझड इथे झाली कशाने?
एवढी पडझड इथे झाली कशाने?
एक केवळ शब्द तो मोडून गेला
आवडले.
चांगले आहेत..
१) ८/१० छान आहे. मांडणी विलक्षण प्रवाही.
२) ५/१० माणिकशी सहमत
३) ७.५/१० छान आहे. 'शब्द मोडणे' आणि पडझड होणे ...वाहवा!
-आपले आभाळ :)
चांगले...
१. ७.५/१०
२. ५.५/१०
३. ७.५/१०
- नचिकेत आठवले
दाद्
१. ७ व्वा
२. ५ (म्हणजे कल्पना अफाट आहे. शब्द इतके तेजस्वी , तार्यासमान की काजव्यांसारखे क्षुद्र (इतरांचे शब्द किंवा अजून काही?) काही चमकण्यासाठी या शब्द सूर्याचा अस्त होणे आवश्यक आहे?)
३. ६.५ कल्पना आणि मांडणी दोन्ही चांगले
उत्तम आहेत.
१.-६.५/१० - चंद्र, दर्या जुने - पण नवी कल्पना, चांगली मांडणी.
२.-७/१० - शब्दांचा अस्त उत्तम. पण काजवे म्हणजे नक्की कोण?
३.- ८/१० - चांगली कल्पना. साधा - सोपा शेर.एक आणि शब्द फिरवावेत असे वाटले.
१) ७/१०-
१) ७/१०- चांगली कल्पना आहे.
२) ६.५/१०- अजून स्पष्ट हवा होता शेर.
३) ७.५/१०- छान आहे. विसूनानांशी सहमत. 'शब्द' आणि 'एक' ची अदलाबदल केली तर जास्त प्रभावी वाटेल.
छान
१ - ७.०
२ - ५.५ - माणिक, नानांशी सहमत. खूपच अस्पष्ट.
३ - ७.५ - मस्तच!! खूप आवडला!!
-- पुलस्ति.
व्वा
१: ७
२: ६
३: ७
१.६/१० २.
१.६/१०
२. नाही कळला
३. ७/१०
ह्म्म्
१. ७/१०
२.५/१०,काजवे म्हणजे नक्की कोण ते न समजले नाही. सूर्य आणि शब्द तशी अनालॉजी काजवे आणि नेमकी कशात? वाचकांवर सोडल्याने शेर प्रभावी वाटला नाही.
३. ८/१० उत्तम कल्पना, शेर आवडला.पण दुसर्या ओळीत लय बिघड्ते आहे.
दुसरा स्पष्ट नाही
१. ७/१०
२. ६/१०
३. ८/ १०