'शेरखान' स्पर्धा : ४

१.
भेटण्या आलीस माझ्या अंगणी तू
अन पहा, प्राजक्तही बहरून गेला!

२.
दूर सीमेवर जरा आवाज झाला
लाख कानांना दडे बसवून गेला

३.
ऐकले, जे बोलले नव्हतेच तेही
आणि वर निष्कर्षही काढून गेला

प्रतिसाद

वा

वा. तिन्ही शेर आवडले.

मस्त आहेत!

१ - ७.० साधी कल्पना पण सुंदर, सुबक शब्द आणि रचना
२ - ७.० थोडा अस्पष्ट वाटतोय, पण मला आवडला. मनात रेंगाळतो. विचार करायला लावतो.
३ - ७.० - शेर छान आहे. 'निष्कर्ष' ऐवजी दुसरा शब्द वापरता येईल का?
-- पुलस्ति.

नचिकेत's picture

वा!!

१. ६.५/१०
२. ७/१०
३. ८/१०

- नचिकेत आठवले

आनंदयात्री's picture

माझे..

१. - ५/१०
२. - ५/१०
३. - ५/ १० - -- हा शेर कळला नाही.. कोणी ऐकलं? आणि कोण निष्कर्ष काढला? या दोन्ही व्यक्ती एकच आहेत का, हे clear झालं नाही... अन्यथा दोन मिसर्‍यातली twist आणखी छान अधोरेखित झाली असती..

माझा निष्कर्ष...

१)४.५/१०
अंगण म्हटले की प्राजक्त अथवा तत्सम स्वरूपाचे झाड हे हल्ली फारच Common झालंय. आणि त्यात 'ती' आली की बास!!सगळाच बहराबहर होतो!!शेर मनाला भिडला असताही ...पण सानी मिसर्‍यात ते 'अन पहा' कशाला बसवलंय?? केवळ मीटर सांभाळावे म्हणून चार अक्षरं वाया गेल्यासारखी वाटताहेत. 'अन पहा' चा उद्देश्य वाचकाशी हळवा तरल संवाद साधावा असाही असेल ..पण तो तितकासा साध्य झाला नाही हे खेदाने इथे नमूद करावे लागेल.

२)७.५/१० वा!! हे खरोखरीच नाविण्य..सहजतेचा गळा न दाबता अगदी प्रवाहीपणे आलेला शेर..कुठेही शब्दाळपणा नाही की अर्थाची कसरत नाही.सरळ सरळ थेट काळजात घुसखोरी करणारा शेर!!! 'लाख कानांना दडे बसले' ह्यातून अतिशय प्रगल्भ आणि तटस्थ विचार प्रकट होतोय. एकदा का कानांना दडे बसले की पुढचे सगळे आवाज फोल ठरतात. भितीने कानांना दडे बसण्यापेक्षा 'रोज मरे त्याला कोण रडे' ह्या अर्थाने हा शेर मला फारच आवडला. 'रोज फुटे त्याला कोण ऐके' असंच म्हणायला हवं. वा! सुंदर शेर. विशेषत: भारतीय मानसिकतेचे कोडगेपण चपखलपणे व्यक्त झाले आहे. अभिनंदन! :)

३)५/१० उला मिसरा आत्म-संवादी प्रवृत्तीचे चित्रण करण्यास बर्‍यापैकी यशस्वी झाला आहे. पण
'बोलले नव्हतेच' आणि 'बोललेच नव्हते' ह्यात थोडा फरक आहे. सध्या तरी मला 'बोललेच नव्हते' ह्यात जास्त Tragedy प्रकट झाली असती असे वाटतेय.

'आणि वर निष्कर्षही काढून गेला' ... ठिक. 'निष्कर्षही काढून जाणे' छान...सहज/साधे/सोपे... बर्‍यापैकी सुंदरही. पण... 'आणि वर' हे अगदीच फुसकं वाटतंय. इथेही शेर/व्यथा 'बोलकी' करण्याच्या प्रयत्नात 'घरगुती संवादाचे अळणी' निर्माण झाले आहे.

-आपले आभाळ :)

चांगले आहेत.

१.- ५/१०. जुना.अंगण, प्राजक्त, तू, बहरणे -सग्गळे तेच आणि तसेच.
२.-६/१०. चांगला. नक्की काय अभिप्रेत आहे? अण्वस्त्रचाचणी?
३.-७.५/१०. उत्तम. पटला. बर्‍याच वेळा होते असे.

१) ६/१०-

१) ६/१०- कल्पना छान आहे, पण आता नाविन्याची अपेक्षा ठेवतोय.
२) ८/१०- मस्त. परिणामकारक आहे.
३) ६.५/१०- अर्थ छान. पण शब्दयोजना क्लिष्ट आहे, फार वेळा थांबावे लागले वाचताना.

व्वा

१. : ७.५
२. : ७.५
३. : ८.५

रसिक's picture

ठीक

१. ५/१० कल्पना. मांडणी यात काही वेगळे वाटले नाही
२. ६/१० सगळेच धूसर.. नेमका कोणता अर्थ घ्यायचा याची खूप सूट , कल्पनाही वेगळी नाही.
३. ८/१० छान, तीच कल्पना पण अनुभव विश्वाचे चित्रण करणारा जिवंत शेर. आवडला.

५/१० तू

५/१० तू भेटायला अंगणापर्यंत आल्यावर प्राजक्ताचे बहरणे किमान वाटते. म्हणून अन पहा.. अंहं.
२. कळला नाही
३.५/१० तेही?