कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
१.
धूमकेतूसारखा आला पुन्हा तो
आठवांचे चांदणे उधळून गेला
२.
बाटलीतुन काय साकी ओतले तू?
आज प्यालाही कसा झिंगून गेला?
३.
बरसला नाहीच तो येऊनसुद्धा
दुर्दशा जवळून न्याहाळून गेला
प्रतिसाद
माझे ...
१. ६.५/१०
२. ७.५/१०
३. ६.५/१०
- नचिकेत आठवले
बरं....माझेही...
१)६.२५/१० धूमकेतूसारखा आला होय!!! धूमकेतू चांदणे उधळू शकतात हे माहीत नव्हते.सानी मिसरा नेहमीचा..नाविण्य नाही..पण धूमकेतूसारखे त्याचे येणे जरा हटकेच..म्हणून आवडले.
२)५.५/१० . अश्या आशयाचे बरेच उर्दू शेर वाचनात आले आहेत..म्हणून काही विशेष वाटले नाही. शिवाय 'बाटलीतून' किंवा 'बाटलीतुनी' असे असते तर ठिक होते...पण 'बाटलीतुन' इथे 'तुन'न ला थोडेसे का होईना व्यंग सोसावे लागतेय..
३)५.७५/१० हे देखील नेहमीचे तेच तेच...एकूणच मराठी गझलेतील मेघ-प्रतिमांना बरसण्याचे वावडे आहे.तरीदेखील'दुर्दशा जवळून न्याहाळून जाणे'विचार करण्यासारखे आहे! म्हणजे 'तो बरसलाच नाही' म्हणून 'दुर्दशा झाली' की 'दुर्दशा झाली' तरी 'तो बरसलाच नाही' अश्या अर्थाने मानवीय प्रवृत्तींच्या जवळपास पोहोचण्याचा शेर-रूपी कवितेचा प्रयत्न प्रामाणिक आहे.
--आपले आभाळ :)
दाद
१. ६/१० -हं...
२. ७/१० -हं, हं (उर्दुइश वाटतं नाही?)
३. ८/१० - व्वा.
बरे आहेत.
१. -४.५/१०. -आभाळाशी सहमत.
२.-५/१०. -जुना.
३.-४.५/१० - ???
फेरी २ नंतर एकदम निराशा... वाघाचे कातडे!
१) ५/१०-
१) ५/१०- धूमकेतू आणि चांदणे?
२) ५/१०- आहे छान, पण टीपिकल
३) ६/१०- तिच तिच कल्पना.. 'दुर्दशा'ची कल्पना नवीन.
माझे गूण
१ - ५.० : आभाळ/नानांशी सहमत.
२ - ४.० : काहिही नाविन्य नाही - कल्पना आणि रचनेतही.
३ - ४.० : "मेघ (किंवा इतर कोणी) जवळ येतो आणि दुर्दशा न्याहाळून जातो" हे जरा ओढूनताणूनच वाटते.
आनंदयात्रींच्या 'घनन घनन" मुळे मला गुण बदलून ७.० करायचे आहेत. चालेल का?
-- पुलस्ति.
ही फेरी
ही फेरी थोडी अपेक्षाभंग करणारी!!
१. - ६/१० आभाळाशी सहमत.
२. - ८/१० स्वतंत्रपणे या शेर चा विचार केला आणि आवडला..
३. - ८/१० पुलस्तिंशी थोडा सहमत नाहिये.. मला हा शेर वाचून "लगान" मधला "घनन घनन घन" गाणं संपल्यानंतर चा सर्वांचे चेहरे उतरल्याचा scene आठवला...
लगान :)
खरच की आनंदयात्री! आता मला शेर आवडतोय असे वाटते!! गुण बदलू शकतो का?
-- पुलस्ति.
बरे आहेत शेर !
१.-> ४/१०
२.-> ५/१०
३.-> ७/१० गजलेच्या जमीनीशी प्रामाणिक वाटला हा शेर मला. जरी कल्पनेत नाविन्य नसल तरी सहजता अन आशय दोन्ही गोष्टी साधल्यात !
१.४/१०धुमक
१.४/१०
धुमकेतूचं पुन्हा येणं असेल तर उल्या मिसर्यात.. अन युगांचे चांदणे उधळून गेला.. असं काहीसं हवं होतं. कारण ते जर धूमकेतूचं येणं असेल तर आठवांच्या मोहातही अडकणार नाही असं वाटतं. शिवाय धुमकेतूमुळे उल्या मिसर्यात काहीतरी एसोथेरिक किंवा एटर्नल भावना किंवा अनुभूती अपेक्षीत वाटते किंवा माझ्याकडून केली गेली.
किंवा माझं रसग्रहण गडलं असेल.
२.५/१०
बाटलीमुळे शेर वाया गेला असं वाटलं.
बोली भाषा मराठी गझलेत यायला हवी असं मागे जाणकारांचं मत वाचलं होतं. पण बाटली खटकलीच.
शिवाय कशातून काय ओतले? यापेक्षा " साकी जे नेहमी ओततेस/ओततोस त्या सोबत आज काय ओतलयस?' हे जास्त पोचेल ना? जसं.. काय साकी ओतले तू आणखीचे?
बाकी उल्या मिसर्यातला झिगलेला प्याला.. क्या बात है! व्वा! फिदा!
चू भू द्या घ्या
३. ४/१०
धूमकेतूसारखा आला पुन्हा तो
धूमकेतूसारखा आला पुन्हा तो
आठवांचे चांदणे उधळून गेला
आवडले.
छान्
१.७/१० एखाद्या व्यक्तीने अवचित केव्हातरी येणे आणि आठवांना उधळून जाणे ही कल्पना आवडली. शास्त्रीय तर्काने या दोन ओळीतला प्रत्यक्ष संबंध लागतो किंवा नाही हे ठरवणे वेगळे. धूमकेतू केव्हातरी दिसतो, त्याच्यामागे पांढरा धूसर पट्टा दिसतो. खाली पडल्यावर धूळ माती उडवत असणार बहुतेक. भावना पोहोचल्या.
२. ५/१० नेहमीचा साधारण शेर्
३. ८/१० हा शब्दार्थी मेघाला उद्देशून असला तरी रूपकातून् प्रेमाचा, जिव्हाळ्याचा वर्षाव करावा अशा व्यक्तीने दुसर्याला तसेच सोडून जाणे, मदतीचा हात पुढे करावा असे न करता गरजूंना सोडून जाणे असे अनेक अर्थपदर आहेत. म्हणूनच हा शेर जास्त प्रभावी . पण सुद्धा शब्दाने जरा म्हणायला अवघड वाटला..
सुंदर
१: ६.५
२: ७.५
३: ७.५