कार्यशाळा समारोप
निकाल जाहीर !!! :)
अधिक माहितीसाठी कार्यशाळेला भेट द्या..
१.
हासण्याने गवसला होता पुरावा
लाजण्याने फैसला होऊन गेला
२.
हुंदका साधा तुझा सांगून गेला
तो जुन्या पत्रांतुनी भेटून गेला
३.
मग्न होतो पूजनामध्ये जयाच्या
तो कितीदा दार ठोठावून गेला...
प्रतिसाद
वा!
हे शेर खूप मस्त आहेत
१ - ८.० झक्कास आहे! वाहवा!! क्या बात है!! शेले-पटके!! शिट्या
२ - ७.० साधा पण सुटसुटीत चांगला शेर...
३ - ६.५ छान कल्पना. पण उला मिसरा - पूजन, जयाच्या मुळे - जरा अडखळवणारा झाला आहे. वर 'पूजन' आणि खाली 'दार' यामुळे अपेक्षित वजन येत नाहिये. मी "बोलावण्यात" च इतका मग्न होतो - असा मिसरा वर असेल तर जास्त परिणाम येईल असे वाटते.
भान हरपुन मी कुणा बोलावतो?
तो कितीदा दार ठोठावून गेला
असे काहितरी...चू.भू.द्या.घ्या.
-- पुलस्ति.
तिन्ही सही
मान गये.
१.-९ -क्या बात!
२.-८.५ -सुंदर मतला, सांगून जाण्याला उत्तम सानी मिसरा
३.-८.७५ - वाह वा!
गुरु! तराजूवर माशी बसावी - इतकाच फरक..
मस्त !
१. -> १० - सहजता कौतुकास्पद, अन आशय तर खल्लास अगदी ! प्रचन्ड आवडला !
२.->७
३.->७
मस्त
तिन्ही आवडले
१. ८.५
२. ८.५
३. ८.५
हाय !!!मार डाला!!
१)९.४/१०
२)७.८/१०
३)८.५/१०
-वाहवा!!शेरखान...मजा आ गया!!
-आभाळ :)
माझे गूण...
१. ९/१०
२. ७.५/१०
३. ६/१०
- नचिकेत आठवले
दाद
१. ८/१० - वाहवा.
२. ६/१० -
३. ८.५/१० - एकदम पुंडलिकाने उभ्या ठेवलेल्या उगे अठ्ठावीसंची आठवण करून दिली
१) ९/१०- गोड
१) ९/१०- गोड आहे.
२) ६/१०- ठीक
३) ६/१०- कल्पना छान, पण अजून चांगली येऊ शकली असती
वा!! १. -
वा!!
१. - ८/१०
२. - ६/१०
३. - ८/१०
१. व्वा!
१. व्वा! क्या बात है! १०/१०
२.पटला नाही.
३.५/१०
जयाच्या..मुळे थोडी गडबड वाटते. त्या जागी तयाच्या आणि उल्या मिसर्यात 'जो' असं वाचून अर्थगही बदलत नाही.
चू भू द्या घ्या
तो कितीदा दार ठोठावून गेला
हासण्याने गवसला होता पुरावा
लाजण्याने फैसला होऊन गेला
सुंदर. फैसला उर्दू वाटते.
हुंदका साधा तुझा सांगून गेला
तो जुन्या पत्रांतुनी भेटून गेला
वेगळी कल्पना. अभिनंदनीय.
मग्न होतो पूजनामध्ये जयाच्या
तो कितीदा दार ठोठावून गेला...
वा. ताकदीचा शेर.
हा गट सरस्
१. ७/१० उत्तम ,शेर आवडला.
२. ६/१० मतल्याचा वेगळेपणा
३. ८/१० कल्पना चांगली
ह्या गटातील शेर कल्पना , मांडणी आणि सहजतेसाठी वरचढ आहेत. पण शेर लिहितांना काही मर्यादा आहेत जसे कर्ता, उद्देशून लिहिलेल्या व्यक्ति,ग्राह्य धरलेली स्थिती. एका शेरातून अनेक अर्थपदर उलगडले तर अधिक आनंद होतो हे सर्वच शेर त्या निकषावर तेवढे ताकदीने उतरत नाहित.